शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’ डाॅक्टरने रुग्णााच्या आईला लावली कानशिलात

By सुरेंद्र राऊत | Updated: May 16, 2024 20:23 IST

प्रशासनाकडून चाैकशी समिती : ऑल इंडिया पँथर सेनेची आक्रमक भूमिका

यवतमाळ: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलासाेबत असलेल्या आईला निवासी डाॅक्टरने कानशिलात मारली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ७ वजता घडला. या घटनेनंतर महिलेचे संतप्त नातेवाईक व ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी रुग्णालयात पाेहाेचले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यात तत्काळ चाैकशी समिती गठीत करून चाैकशी सुरू केली आहे.

श्याम ज्ञानेश्वर तिजारे (३८) हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत असलेल्या वाॅर्ड क्रं. २७-२८ मध्ये भरती हाेता. त्याच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू हाेते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लाईफ सपाेर्टवर ठेवण्यात आले हाेते. गुरूवारी सकाळी ७ वाजता वाॅर्डमध्ये कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॅ. गाैरव जैन आले असता, त्यांना लाईफ सपाेर्टर मशिनचे बटन बंद दिसले, मशीन बंद केल्याने श्यामची प्रकृती आणखी बिघडली.

बटण काेणी बंद केले याबाबत डाॅक्टरने विचारणा केली, यातूनच श्यामच्या आईचा डाॅ. गाैरव जैन याच्याशी वाद झाला. दरम्यान श्यामची प्रकृती अधिक गंभीर हाेवून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डाॅ. गाैरव याने आपल्या कानशिलात मारली असा आराेप अन्नपूर्णाबाई यांनी केला. महिलेने ही घटना नातेवाईकांना सांगताच त्यांनी पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. डाॅक्टरने मारहाण का केली, याचा जाब विचारण्यात आला. कारवाई करा अन्यथा उग्र आंदाेलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने या प्रकरणात प्राप्त तक्रारीवरून चाैकशी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेंद्र भुयार, श्वसनविकारशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. रवींद्र राठाेड, उपवैद्यकीय अधिक्षक डाॅ. दुर्गेश देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. समितीच्या अहवालानंतर कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर काेणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.रुग्णाच्या आईला मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यात दाेषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.डाॅ. गिरीश जतकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय.

टॅग्स :Yavatmalयवतमाळhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर