शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST

काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे कुटुंब चिंतेत आहे. घरात वेळेवर किराणा येत नाही. महिना संपताच घरमालकाच्या किरायासाठी चकरा सुरू होतात. पाल्याची फी भरण्यासाठी शाळेतून वारंवार निरोप येतात. लवकरच देऊ, एवढेच या कुटुंबांचे उत्तर असते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामावर नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कठोर कारवाई केली. निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फी, बदली आदी प्रकारच्या कारवायांमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तीन महिन्यांपासून हाती एक पैसाही आला नाही. सुरुवातीचा महिना कसातरी निघाला. मात्र, त्यापुढील दोन महिने या कर्मचाऱ्यांची परीक्षा पाहणारे ठरले आहे. यवतमाळ विभागातील ७९६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची विवंचना वाढली आहे.काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे कुटुंब चिंतेत आहे. घरात वेळेवर किराणा येत नाही. महिना संपताच घरमालकाच्या किरायासाठी चकरा सुरू होतात. पाल्याची फी भरण्यासाठी शाळेतून वारंवार निरोप येतात. लवकरच देऊ, एवढेच या कुटुंबांचे उत्तर असते.महिन्याचा खर्च साधारणपणे १२ ते १५ हजार रुपये आहे. किराणा, घरभाडे, दूध, भाजीपाला, पाल्याचे शिक्षण, भाजीपाला, पेट्रोलपाणी असा खर्च यातून भागवावा लागतो. आतापर्यंत उधार-उसणवार करून घरखर्च चालविला. आता मात्र या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सहनशीलता संपत चालली आहे. 

३२३ कर्मचारी निलंबितमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ३२३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. याशिवाय १०६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. २१३ कर्मचारी बडतर्फीच्या कारवाईत अडकले, तर १५४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, २६६ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता चिंता वाटत आहेघर किरायाचे आहे. उधार उसणवार करून उदरनिर्वाह चालविला जात आहे. घराचे भाडे, किराणा, याशिवाय इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद झाले, कसेतरी भागविणे सुरू आहे. आता चिंता वाटत आहे. घरात वृद्ध आईसह चार सदस्य आहे. पाल्याचे शिक्षण अडचणीत येण्याची भीती आहे. साधारण उपचार घेण्यासाठीही जवळ पैसा नाही. तडजोड करावी लागत आहे. कर्जावरील व्याज फुगत आहे. आर्थिक नुकसान होत आहे. पण पुढे चांगले दिवस येतील ही आशा आहे, अशा प्रतिक्रिया संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी नोंदविताना चिंताही व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप