शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हाॅर्नबील पक्ष्याची ख्याती गाजणार बँकॉकमध्ये !

By अविनाश साबापुरे | Updated: May 13, 2023 17:12 IST

Yawatmal News जगभरात झपाट्याने दुर्मिळ होत चाललेला पण मध्य भारताच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या हाॅर्नबिल या देखण्या पक्ष्याची ख्याती आता विदर्भातील अभ्यासक थेट थायलंडमध्ये मांडणार आहेत.

अविनाश साबापुरेयवतमाळ : जगभरात झपाट्याने दुर्मिळ होत चाललेला पण मध्य भारताच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या हाॅर्नबिल या देखण्या पक्ष्याची ख्याती आता विदर्भातील अभ्यासक थेट थायलंडमध्ये मांडणार आहेत. बँकॉक येथे २२ ते २४ मे दरम्यान त्यासाठी खास ‘आंतरराष्ट्रीय हाॅर्नबिल परिषद’ आयोजित करण्यात आली असून त्यात जगभरातील संशोधक हॉर्नबिलच्या विविध प्रजातीवर संशोधन मांडणार आहेत.

विदर्भातील ज्येष्ठ पक्षी संशोधक, मध्य भारतातील हॉर्नबिल पक्षी प्रजातीचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. गजानन वाघ यांना परिषदेकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत संशोधन विद्यार्थी निखील बोरोडे आणि प्रतिक चौधरी तसेच वन्यजीव, पर्यावरण संवर्धन संस्थेचे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण मोरे देखील सहभागी होणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील इंडियन ग्रे हॉर्नबिल (राखी धनेश) या पक्ष्यांचा विणीचा अभ्यास तसेच मध्यभारतातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात आढळणारा अतिशय दुर्मिळ मलबार पाइड हॉर्नबिल (मलबारी धनेश) या पक्ष्यांच्या प्रजातींचा विस्तार, विणीचा अभ्यास व विणीच्या हंगामातील खाद्य आदी विषयावर ते आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.

हॉर्नबिल पक्षी प्रजातींचे संशोधन, संवर्धन, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, तसेच बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी हॉर्नबिल फाउंडेशनतर्फे दर चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषद घेतली जाते. तीन दिवसाच्या परिषदेमध्ये ५० सादरीकरण आणि ४ बीजभाषण होणार आहेत. हॉर्नबिल संशोधनासंबंधी कार्यशाळेचेसुद्धा आयोजन केले जाणार आहे. जगप्रसिद्ध हॉर्नबिल तज्ञ प्रोफेसर डॉ. पिलाई पुनसवाड थायलंड, डॉ. लुसी केम्प आफ्रिका, डॉ. अप्रजीता दत्ता भारत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. डॉ. वाघ व त्यांचे संशोधन विद्यार्थी हॉर्नबिल संशोधनात नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावरील कार्यशाळेत भाग घेणार आहेत. 

हाॅर्नबिलच्या जगात ५७ प्रजाती जगात हॉर्नबिल पक्ष्यांच्या एकूण ५७ प्रजाती आहेत. त्यापैकी जवळपास ३२ प्रजाती आशिया खंडात व २५ प्रजाती दक्षिण आफ्रिका खंडातील देशांमध्ये आढळून येतात. भारतात यापैकी ९ प्रजाती आढळतात. तर महाराष्ट्रातील जंगलात ४ प्रजाती आढळतात. परंतु, मध्य भारतातील सातपुड्यातील जंगलात मात्र दोनच प्रजाती आढळतात. हॉर्नबिल पक्ष्यांच्या प्रजाती जंगलातील अनेक वृक्ष प्रजातींचा प्रसार करण्यात व नैसर्गिकरीत्या जंगल तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. अलीकडे जंगलतोड, फळझाडांची कमतरता, जंगलामध्ये मनुष्यांचा व गुरांचा वाढता वावर यामुळे या पक्ष्यांच्या प्रजाती झपाट्याने कमी होत आहेत.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य