शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयाने होणार अनेक संसार उद्‌ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  प्रत्येकजण या दुकानामध्ये जात असतो. अशाठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारूड्यांना सहजच दारू मिळणार आहे. आज वाईन विक्री होईल, उद्या छुप्या मार्गाने त्याचठिकाणी दारूही विकली जाईल. अधिक नफा मिळतो म्हणून दुकानदारही याच वस्तू विकेल. यातून कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल. वाईन विक्रीचा निर्णय सरकारने बदलावा, असे मत महिलांनी नोंदविले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईनची विक्री करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला गावखेड्यापासून शहरापर्यंत प्रचंड विरोध होत आहे. अनेक महिलांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा संतप्त प्रश्न विचारला आहे. किराणा दुकान हे पारिवारिक दुकान म्हणून ओळखले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत  प्रत्येकजण या दुकानामध्ये जात असतो. अशाठिकाणी वाईनची विक्री झाली तर दारूड्यांना सहजच दारू मिळणार आहे. आज वाईन विक्री होईल, उद्या छुप्या मार्गाने त्याचठिकाणी दारूही विकली जाईल. अधिक नफा मिळतो म्हणून दुकानदारही याच वस्तू विकेल. यातून कुटुंब व्यवस्था मोडकळीस येईल. वाईन विक्रीचा निर्णय सरकारने बदलावा, असे मत महिलांनी नोंदविले. 

काय आहे राज्य सरकारचा निर्णय?- किराणा दुकान आणि माॅलमध्ये वाईन विक्री करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे किराणा दुकानात वाईन सहज उपलब्ध होणार आहे. 

महिला नेत्यांना काय वाटते?

सरकारच्या या निर्णयाबद्दल जनमानसात अतिशय वाईट प्रतिक्रिया उमटत  आहेत. किराणा दुकान सोडून अनेक ठिकाणी वाईन विक्री करता येते. किराणा दुकान हे पारिवारिक दुकान आहे. याठिकाणी वाईनची विक्री नको.            - वनमाला राठोड, जिल्हाध्यक्ष, महिला कॉंग्रेस 

गृहिणी आणि सर्वसामान्य महिला म्हणून या निर्णयाला माझा विरोध आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करायला हवा. पक्षपातळीवरही फेरविचाराचे संकेत मिळत आहेत. हा निर्णय चुकीचा आहे.          - सारिका ताजने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

हा निर्णय किशोरवयीन मुलांना बिघडवणारा आहे. दुकानांमध्ये जाणारी ही मुले पुढे जाऊन व्यसनाच्या अधिन होतील. यामुळे समाजावर त्याचा वाईट परिणाम होईल. हा निर्णय रद्द करायला हवा.         - वैशाली खोंड, महिला सरचिटणीस, भाजप

किराणा दुकानात  वाईनची विक्री केली तर सर्वसामान्य नागरिकाला जगणे कठीण होईल. जनतेला धोका  होईल. मद्यपी लोकांची सोय होईल. गावाची शांतताही भंग होईल. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा.         - मंदा गाडेकर, जिल्हा संघटिका, शिवसेना

महिला सामाजिक कार्यकर्त्या काय म्हणतात?

वाईन म्हणजे दारू नव्हे, असे खोटे सांगितले जात आहे. त्यात १४ टक्के अल्कोहोल आहे. ज्यामुळे हळूहळू व्यक्ती दारूच्या आहारी जाईल. हा निर्णय रद्द करावा.    - सादिया निकहत, अध्यक्ष, जमाअत-ए-इस्लामी हिंद  

सरकारला केवळ डोळ्यासमोर पैसा दिसतो आहे. जनसामान्यांच्या संसाराचे कुठलेही सोयरसूतक नाही. सरकारचं डोकंच ठिकाणावर नाही. हा सर्वाधिक घातक निर्णय आहे. - प्रज्ञा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीGovernmentसरकार