शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ठाणेदाराने ताणली पोलीस शिपायावर रिव्हॉल्वर

By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST

अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो.

हमीद खॉ पठाण - अकोलाबाजारअपुरे मनुष्यबळ, त्यामुळे महत्वाचे काम असूनही न मिळणाऱ्या सुट्या, रिलीव्हरची कमतरता, त्यातून वाढणारे कामाचे तास, सलग करावी लागणारी ड्युटी, यातून वाढणारा ताण-तणाव पोलीस दलात जीवघेणा ठरू शकतो. याचा प्रत्यय वडगाव जंगल पोलीस ठाण्यात मंगळवारी आला. ड्युटी लावण्यावरून ठाणेदाराने चक्क पोलीस कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्वर ताणली. अखेर सदर कर्मचाऱ्याने या प्रकरणाची आपल्या वरिष्ठांकडे मौखिक तक्रार नोंदविली आहे. वडगाव जंगल पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता हा प्रकार घडला. एका पोलीस कर्मचाऱ्याने रात्री ड्युटी पूर्ण केली. त्याला घरी जायचे होते. परंतु त्याचा रिलीव्हर अर्थात दुसरा कर्मचारी आला नाही. कारण त्या कर्मचाऱ्याची आजी अचानक वारली. इकडे ठाणेदारालाही आरोपीच्या शोधात जवळा (ईजारा) येथे जायचे होते. म्हणून दुसरा कर्मचारी येईपर्यंत तुम्ही थांबा, अशी सूचना ठाणेदाराने त्या कर्मचाऱ्याला केली. नेमक्या याच कारणावरून वाद उद्भवला. ठाणेदार व कर्मचाऱ्यात तू-तू-मै-मै झाली. ठाणेदाराची विनंती धुडकावून सदर पोलीस कर्मचारी आपल्या निवासस्थानाकडे जात असताना ठाणेदाराचाही संताप अनावर झाला. त्यातच संयम सुटल्याने त्यांनी या कर्मचाऱ्यावर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर रोखल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. ठाणेदाराने मात्र हा आरोप फेटाळला आहे. सदर कर्मचाऱ्यास रिलीव्हर येईस्तोवर ड्युटी करा, असे बजावले होते. मात्र रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोबतच अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग, मोठे कार्यक्षेत्र, सोईसुविधांचा अभाव, कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम करताना होणारी तारेवरची कसरत, त्यातून निर्माण होणारे गैरसमज याबाबतही ठाणेदाराने आपले मन सदर प्रतिनिधीकडे मोकळे केले. वडगाव (जंगल) पोलीस ठाण्यात ड्युटीचा वाद नेहमीच ऐकायला मिळतो. या ठाण्यात २७ कर्मचारी तैनात आहेत. त्यातील काही कर्मचारी साप्ताहिक रजा, इतर रजा यामुळे उपलब्ध होत नाहीत. स्टेशन डायरी, वायरलेस ड्युटी, आरोपी गार्ड ड्युटी, कोर्ट ड्युटी यात अनेक कर्मचारी व्यस्त असतात. त्यामुळे एका पाळीला अवघे बोटावर मोजण्याऐवढे कर्मचारी उपलब्ध होतात. त्यातच पोलीस ठाण्याचा अवाका दोन-तीन तालुक्यात असल्याने काम करताना अडचण निर्माण होते. अनेकदा सलग ड्युटी करावी लागत असल्याने आणि वेळीच रिलीव्हर उपलब्ध होत नसल्याने पोलिसांमध्ये ताण-तणाव वाढतो. त्यातूनच संतापाच्या भरात अशा घटनांना खतपाणी मिळते. ही समस्या जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांची आहे.