शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदार लागले मोक्का, एमपीडीएच्या तयारीला

By admin | Updated: March 20, 2017 00:17 IST

समाजासाठी घातक ठरू पाहणाऱ्या दारू विक्रेते, क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांच्याविरूद्ध मोक्का, एमपीडीए, तडीपारी यासारखी कठोर कारवाई

एसपींचे आदेश : दारू विक्रेते, गुन्हेगारांच्या रेकॉर्डची जुळवाजुळव यवतमाळ : समाजासाठी घातक ठरू पाहणाऱ्या दारू विक्रेते, क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांच्याविरूद्ध मोक्का, एमपीडीए, तडीपारी यासारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील ठाणेदारांनी रेकॉर्डची जुळवाजुळव चालविली आहे. यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी सध्या नियंत्रणात दिसत असली तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, अशी हूरहूर नागरिकच नव्हे तर पोलीस दलातूनही ऐकायला मिळते आहे. भविष्यात टोळीयुद्धाला सामोरे जावे लागू नये म्हणून आत्तापासूनच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झोपडपट्टीदादा कायदा) व तडीपारी यासारख्या ठोस प्रतिबंधात्मक कारवाईच्या पर्यायांचा विचार करण्याचे आदेश दिले आहे. सर्व क्रियाशील गुन्हेगारांचे क्राईम रेकॉर्ड काढा, त्यानुसार ते उपरोक्तपैकी कशात बसतात, त्यात त्यांचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना देण्यात आल्या. अवैध दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक, पुरवठा यात वारंवार सहभाग सिद्ध झालेल्या व्यक्तींवर एमपीडीए लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. क्रियाशील गुन्हेगारांसाठी मोक्का व तडीपारीचा पर्याय निवडला जाणार आहे. एसपींच्या आदेशानंतर जिल्हाभरातील ठाणेदार कामाला लागले आहेत. सर्व गुन्हेगारांची कुंडली व क्राईम रेकॉर्ड तपासले जात आहे. या गुंडांचा सध्या समाजाला कुठे त्रास आहे का, हे तपासूनच कारवाई केली जाणार आहे. दारू प्रकरणात मात्र मोठ्या प्रमाणात एमपीडीएची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: यवतमाळ शहर, वडगाव रोड, कळंब, राळेगाव, वडकी, वणी, मारेगाव, शिरपूर यासारख्या वर्धा व चंद्रपूर या दारू प्रतिबंधित जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यात एमपीडीएच्या कारवाईवर अधिक भर दिला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सात ठाण्यांच्या हद्दीत क्राईम रेकॉर्डची तपासणी पुसद, दिग्रस, उमरखेड, यवतमाळ शहर, वडगाव रोड, वणी, पांढरकवडा या ठाण्यांच्या हद्दीत मोक्काच्या दृष्टीने गुन्हेगारांच्या क्राईम रेकॉर्डची तपासणी होत आहे. एसपींच्या या मोक्का, एमपीडीए व तडीपारीच्या आदेशाची गुन्हेगारी वर्तुळातही चर्चा असून अनेक क्रियाशील गुन्हेगार व दारू निर्मिती-तस्करीमध्ये सक्रिय असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. दारू व्यवसायातील मोठे क्राईम रेकॉर्ड असलेल्या व राजकीय अभय लाभलेल्या प्रतिष्ठीतांचीही या कारवाईतून सुटका होणार नसल्याचे सांगितले जाते.