शेकडो रुग्ण सुरेंद्र राऊत - यवतमाळ पावासाची दडी आणि उन्हाळ््यासारखे वातवरण अशा विषम परिस्थितीत जिल्ह्यात विषाणूजन्य साथ रोगाने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. प्रत्येक कुटुंबात रुग्ण असून ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखीने बेजार झाले आहे. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अशा रुग्णांची दररोज गर्दी वाढत असून मेडिसीन वार्डात पाय ठेवायलाही जागा नाही. नाईलाजाने रुग्णांना जमिनीवर झोपवून डॉक्टर उपचार करत आहे. तर सलाईन स्टॅँड कमी पडत असल्याने भिंतीला खिळे ठोकून सलाईन टांगावी लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून वैद्यकीय महाविद्यालयाची ही स्थिती आहे. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयेही अशाच रुग्णांनी गजबजलेले दिसत आहे. सकाळी ढगाळ वातावरण , दुपारी उन्हाळ््यासारखे उन आणि सायंकाळी असाह्य उकाडा असे विषम वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. विषाणूजन्य आजाराचा प्रकोप हा साधारणत: पाऊस ओसरल्यानंतरच्या स्थिती निर्माण होते. यावर्षी मात्र सुरूवातीपासूनच दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे विषाणूजन्य आजाराने डोकोवर काढले आहे. प्रत्येक घरात एक ना एक रुग्ण दिसत आहे. काही घरात पूर्ण कुटुंबच आजार असल्याचे दिसत आहे. सुरूवातीला अंग दुखणे, त्यानंतर शिंका येणे, खोकला आणि शेवटी तापाने फणफणने अशी लक्षणे प्रत्येकात दिसत आहे. सुरूवातीला घरीच गोळ््या घेवून उपचार करण्याचा प्रयत्न रुग्ण करतात. मात्र यालाही विषाणू जुमानत नाही. शेवटी उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. शासकीय रुग्णालयात पुरेशी यंत्रणा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्ण त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
तापाचे थैमान
By admin | Updated: August 14, 2014 00:05 IST