शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात लाखोंचे सागवान बेवारस

By admin | Updated: May 17, 2017 00:56 IST

आग लागल्याने टिपेश्वर अभयारण्यातील सागवानाची मोठमोठी आणि परिपक्व झाडे जमिनदोस्त झाली.

महिना लोटला : १५ लाखांच्या वनसंपत्तीला पाय फुटण्याची भीती अब्दुल मतीन । लोकमत न्यूज नेटवर्क पारवा : आग लागल्याने टिपेश्वर अभयारण्यातील सागवानाची मोठमोठी आणि परिपक्व झाडे जमिनदोस्त झाली. यावरून महिना लोटला, मात्र संबंधित विभागाकडून विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. सुमारे १५ लाख रुपयांच्या या संपत्तीला पाय फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टिपेश्वर अभयारण्यातील सावरगाव-रामनगर जंगलाला आग लागली होती. यामध्ये सागवानाची शंभरावर झाडे जळून कोसळली. ही झाडे केवळ बुंद्याजवळ जळाली असल्याने उर्वरित संपूर्ण भाग पूर्णपणे उपयोगाचा आहे. मात्र ही झाडे अजून तरी संबंधितांनी विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने उचललेली नाही. १० ते १२ एकर क्षेत्रातील सागवान जळत असताना टिपेश्वर अभयारण्याशी संबंधित अधिकारी, कर्मचारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच पडून असलेल्या वृक्षांची योग्य विल्हेवाट लावण्यात विलंब का होत आहे, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. वास्तविक पंचनामा करून ही झाडे सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे अपेक्षित होते. परंतु यावरून दिवसच लोटत चालले आहे. आणखी काही दिवस हिच परिस्थिती राहिल्यास तस्करांची नजर पडल्यास नवल वाटणार नाही. रस्त्यावरील झाडांना आग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरील झाडांना आगी लावण्याचे प्रकार पारवा परिसरात वाढले आहे. मोठमोठी झाडे जाळून पाडली जात आहेत. त्याचा उपयोग केवळ जलतनासाठी केला जात आहे. शिवाय शेतधुऱ्यावर असलेली झाडेही शेतकऱ्यांकडून कापली जात आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होण्याची भीती आहे. वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र अस्तित्वात असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यासोबतच जाळली जात आहे.