शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ परिसरात माकडांच्या टोळक्याची दहशत; आठ जणांना चावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:07 IST

Yawatmal news सध्या गाव परिसरात माकडांच्या टोळक्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यातूनच गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या गाव परिसरात माकडांच्या टोळक्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. धान्य व अन्य वस्तूंची नासधूस करणाऱ्या या माकडांनी आता माणसांवर हल्ले चढविणे सुरू केले आहे. त्यातूनच गुरुवारी तब्बल आठ जणांना गंभीर चावा घेतल्याची घटना डेहणी येथे घडली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.विनायक अर्जुन (५५), सुभाष ठाकरे (५१), नागोजी मेश्राम (६०), नारायण वारसकर, प्रफुल्ल चंदनखेडे (४०), सुधीर चंदनखेडे (३४), देवीचंद रंगारी (४०) आणि प्रमोद चुटे (४०) (सर्व रा. पहूर) या आठ जणांना माकडांनी चावा घेतला. ही घटना डेहणी ता. बाभूळगाव येथील बसथांब्यावर घडली.सध्या उन्हामुळे जंगलातील माकडांची टोळकी रस्त्यावर, वस्त्यांमध्ये येत आहेत. डेहणीच्या बसथांब्यावर गेल्या आठ दिवसांपासून माकडांच्या एका टोळक्याने धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांभोवती ही माकडे जमतात. वाहनांना धक्का देऊन पाडतात.त्यातच गुरुवारी तब्बल आठ जणांना चावा घेतला. या आठ जणांनी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन उपचार घेतले. दरम्यान, गावकऱ्यांनी सूचना दिल्यानंतर वनविभागाची चमू डेहणीच्या बसथांब्यावर माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोहोचली, मात्र माकडे त्यांच्या हाती लागली नाहीत. या घटनेने सध्या परिसरात दहशत आहे. विशेष म्हणजे, असेच टोळके गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ-घाटंजी मार्गावर कोळंबी फाट्यावरही धुमाकूळ घालत आहे. गुरुवारीच या मार्गावर एका दाम्पत्याची दुचाकी माकडांनी अडविल्याने हे दाम्पत्य घाबरून गेले होते.

टॅग्स :Monkeyमाकड