शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यासाठी अटी-शर्तींचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रबी हंगामातील पिकांचा विमा काढताना शेतकऱ्यांना आधारकार्ड मागितले जात आहे. सोबतच अपडेट सातबारा व ...

ठळक मुद्देअपडेट सातबारा : शेतकऱ्यांंना द्यावे लागणार स्वयंघोषणापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रबी हंगामातील पिकांचा विमा काढताना शेतकऱ्यांना आधारकार्ड मागितले जात आहे. सोबतच अपडेट सातबारा व स्वयंघोषणा पत्राची मागणी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.न्यायालयाने आधारकार्डची सरसकट सक्ती करू नका, असा निर्णय दिला. यानंतरही शासकीय कामामध्ये आधारकार्डची सक्ती केली जात आहे. याचा पहिला बळी शेतकरीच ठरत आहे. न्यायालयाच्या निर्वाळ्यानंतरही शासकीय स्तरावर तसे कुठलेच नोटीफिकेशनही निघाले नाही. यामुळे सर्वच ठिकाणी अजूनही आधारकार्ड सक्ती कायम आहे. त्यातच रबीचा पीक विमा काढतानाही आधारकार्ड मागितले जात आहे. यामुळे शेतकºयांपुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच अपडेट सातबारा आणि स्वयंघोषणापत्राची सक्ती केली आहे. यामुळे रबी पीक विमा काढताना आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना पैसा आणि वेळ दोन्ही खर्ची घालावा लागत आहे.निसर्गाच्या लहरीपणाने रबीचे पीक धोक्यात आले आहेत. निसर्ग प्रकोपातून वाचण्यासाठी रबीचा पीक विमा काढला जातो. या पीक विम्याकरिता ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत रबीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकाचा विमा उतरवायचा आहे. त्याकरिता आॅनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी यावर्षीचा अपडेट सातबारा ज्यावर रबीच्या पिकाचा पेरा नोंद असणे आवश्यक आहे. पेºयाची नोंद नसेल तर शेतकºयाला स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. शेतकºयांना पीक विमा काढताच येऊ नये, अशी व्यवस्था शासनस्तरावरून करण्यात आली आहे. एक ना अनेक दस्तावेज व किचकट प्रक्रिया मुळे इच्छा असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.खरिपाच्या निकषातच निघावा रबीचा विमाकर्जदार शेतकऱ्यांचा विमा बँकांनी खरीप हंगामात उतरविला. आता रबीचा विमा उतरविताना ई-महासेवा केंद्रात अर्ज भरावा लागत आहे. या ठिकाणी अनेकवेळा नेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न निर्माण होतो. त्यात बराच वेळ जातो. यामुळे बँक स्तरावरच विमा उतरविण्याची प्रक्रिया व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रबीच्या पीक विम्यासाठी शेतकºयांना अनेक येरझारा माराव्या लागत आहे.