यवतमाळ : पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी वन प्रकल्प विभागातील कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा दहावा दिवस उजाडला आहे. या विभागातील ३४ कामगारांना अपात्र ठरविण्यात आले.१६ आॅक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार वन प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक तसेच व्यवस्थापक संचालक नागपूर यांनीही या कामगारांना नियमित करण्याबाबत कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे चार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान काही बाबींवर सकारात्मक तोडगा निघाल्याने सहकुटुंब ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कामावर घेण्यासाठीचे उपोषण सुरूच असल्याचे राजू मेश्राम यांनी कळविले. ‘नाग’ संघटनेचे निवेदनवनकामगारांच्या आंदोलनात ‘नाग’ संघटनेने सक्रिय सहभाग नोंदवत वन विकास प्रकल्पाच्या नागपूर व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. उपोषणकर्ते आणि इतर वनकामगार पात्र ठरत असूनही त्यांना सेवेत कायम करण्यास नकार देण्यात आला. ही बाब अन्यायकारक आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड आदी उपस्थित होते. ट्रेड युनियन कौन्सील शासन निर्णयानुसार वनकामगारांना नियमित करावे या मागणीसाठी विदर्भ ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे एफडीसीएम नागपूर आणि वन प्रकल्प विभाग यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. या कामगारांना न्याय न मिळाल्यास कर्मचारी संघटना आंदोलनात सहभागी होतील, असे कौन्सीलचे सरचिटणीस श्रीराम खिरेकर यांनी म्हटले आहे.
कामगारांच्या उपोषणाचा दहावा दिवस
By admin | Updated: November 26, 2014 23:14 IST