शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मूर्ती विटंबनेवरून बोरीअरब येथे तणाव

By admin | Updated: September 7, 2014 00:10 IST

बोरी (बु) येथील काळा मारूती मूर्ती विटंबनेच्या घटनेने येथे तणाव निर्माण झाला. निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी मारूती लक्ष्मण जाधव (३५) रा. बोरी बु. याला अटक करण्यात आली.

मारोती अटकेत : बाजारपेठ बंददारव्हा : बोरी (बु) येथील काळा मारूती मूर्ती विटंबनेच्या घटनेने येथे तणाव निर्माण झाला. निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी मारूती लक्ष्मण जाधव (३५) रा. बोरी बु. याला अटक करण्यात आली. मंगेश शेटे हे सकाळी या मंदिरात दर्शनासाठी गेले असता दगडी मूर्तीचा हात तुटल्याचे आणि चेहऱ्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केल्याचे त्यांंना आढळले. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. मूर्ती विटंबनेची खात्री झाल्यानंतर दारव्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. सकाळी ९ वाजता निषेध सभा घेऊन बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान यवतमाळ येथून राज्य राखीव पोलीस दल यासह लाडखेड, दिग्रस, दारव्हा पोलीस दाखल झाले. मंदिरापासून दोनशे फूट अंतरावर आढळलेला घन आणि पिशवीवरून मूर्ती घनाने फोडल्याचा अंदाज बांधण्यात आला. रात्री एक व्यक्तीने मद्यधुंदीत गोंधळ घातल्याची बाब लोकांनी पोलिसांना सांगितली. पकडण्यासाठी पाठलाग करताच संबंधित व्यक्तीने धूम ठोकली. त्यामुळे हा प्रकार त्यानेच केल्याचा संशय बळावला. यावरून मारूती लक्ष्मण जाधव (३५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने मूर्ती विटंबनेची कबुली दिली. धीरज सुरेश जयस्वाल रा. बोरी यांच्या तक्रारीवरून त्याच्या गुन्हा गुन्हा नोंदविला. विटंबना झालेली मूर्ती गावकऱ्यांनी पाथ्रडदेवी येथील धरणात विसर्जित केली. (प्रतिनिधी)