शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१८२ कोटींच्या रस्त्याची निविदा थेट मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:18 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ उपक्रमांतर्गत करळगाव ते बाभूळगाव आणि बाभूळगाव ते कळंब या ५४ किलोमीटरच्या रस्त्याची निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘अ‍ॅन्यूईटी’ : करळगाव-बाभूळगाव-कळंब ५४ किलोमीटरचा मार्ग

राजेश निस्ताने ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ उपक्रमांतर्गत करळगाव ते बाभूळगाव आणि बाभूळगाव ते कळंब या ५४ किलोमीटरच्या रस्त्याची निविदा मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आली आहे.सध्या धामणगाव रोडच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु हा मार्ग करळगावपर्यंतच आहे. तेथून पुढे बाभूळगाव चौकापर्यंत दहा मीटर रस्ता बांधला जाणार आहे. त्यात सात मीटर रोड आणि दोन्ही बाजूने तीन-तीन मीटर पेवर शेड (डांबरीकरण) राहणार आहे. बाभूळगावपासून कळंबपर्यंत जाणारा मार्गही याच पॅकेजमध्ये आहे. याशिवाय यवतमाळ बायपास अर्थात लोहारा चौक ते धामणगाव रोड ते नागपूर रोड हा १३ किलोमीटरचा मार्गही या पॅकेजमध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे. ५४ किलोमीटर अंतरासाठी १८२ कोटी रुपये किंमतीची ही निविदा स्थानिक पातळीवर प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मंजुरीसाठी बांधकाम मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहे. १३ टक्के जादा दराची ही निविदा असल्याचे सांगितले जाते. ‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ उपक्रमांतर्गत उपरोक्त १८२ कोटींची कामे होणार आहे. या उपक्रमात पाच कामांचा समावेश होता. मात्र त्यापैकी एकालाच स्थानिक कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. त्यामुळे आता वेगळा पर्याय शोधला जात आहे.७६५ कोटींचे रस्ते ‘ईपीसी’तून करणार‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ उपक्रमात जिल्ह्यात रस्त्यांचे पाच पॅकेज (कामे) काढण्यात आले होते. त्यामध्ये यवतमाळ-दारव्हा ७६ किलोमीटर, पुसद-शेंबाळपिंपरी ५० किलोमीटर, पुसद-गुंज-महागाव ५० किलोमीटर, अकोलाबाजार ते पांढरकवडा ७५ किलोमीटर आणि पांढरकवडा ते झरी ४५ किलोमीटर या कामांचा समावेश होता. २५५ किलोमीटर लांबी असलेल्या या कामांचे एकूण बजेट ७६५ कोटींचे होते. मात्र स्थानिक कंत्राटदारांनी या उपक्रमाला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे ही कामे आता ‘ईपीसी’ (इंजिनिअरींग, प्रोक्रुमेंट अ‍ॅन्ड कंस्ट्रक्शन) करारातून करण्याचे प्रस्तावित आहे.‘हायब्रीड अ‍ॅन्यूईटी’ अंतर्गत पाच पैकी एका कामाला प्रतिसाद मिळाला असून ही निविदा स्वीकृतीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. प्रतिसाद न मिळालेली कामे ‘ईपीसी’मधून करण्याचे विचाराधीन आहे.- शशीकांत सोनटक्के,अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ.