शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उसळली उमेदवारांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडणार आहेत. या निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. यामुळे शेवटच्या दिवशी चौपट गर्दी वाढली. अर्ज स्वीकारण्यासाठी वेळ वाढविण्यात आला. यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. २९ तारखेपर्यंत आठ हजार ४९० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी गर्दी वाढल्याने उमेदवारांची संख्या दहा हजारांच्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती. तर ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली, त्याकरिता अवास्तव पैसे संगणक केंद्र चालकांनी उमेदवारांकडून घेतले. याप्रकरणी उमेदवारांनी संताप नोंदविला. शिवाय पूर्वीपासूनच ऑफलाइन स्वरूपाची प्रक्रिया पार पाडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच नवख्यांना संधी मिळाली आहे. ऑफलाइन प्रक्रियेने अनेक इच्छुकांना शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करता आले. यामुळे ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार होत्या, त्या ठिकाणी आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढलेली दिसणार आहे.  या निवडणुकीसाठी १४ लाख २० हजार ४४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. काही नवोदित मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये चित्र बदलण्याची स्थिती आहे.  गाव विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरला आहे. नवख्यांना संधी देण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून आणि विरोधी गटाकडूनही होत आहे. या निवडणुकीमध्ये महिला बचत गटांची भूमिका गावपातळीवर महत्त्वाची राहणार आहे. बचत गटांच्या महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वोट बँक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर गावातील तरुण वर्गाला आपल्या पॅनलकडे आकर्षित करण्यासाठी तरुण उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांना बंदी असली तरी सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. मुक्त चिन्ह घेऊन हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी विविध समीकरणांचा वापर ग्रामपंचायतीवर केला आहे. यामुळे या उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह नसले तरी स्थानिक मुक्त चिन्हांवर ही निवडणूक लढली जाणार आहे.  ग्रामपंचायत विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात थेट वळता होत आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षाही सर्वाधिक महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतीला वळता होत आहे. यामुळे प्रत्येक पॅनल आपण विकास घडवून आणू, असे आश्वासन देत आहे.

१५ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले. यामुळे १५ जानेवारीला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये तीन हजार ७३ जागांसाठी २९ डिसेंबरपर्यंत आठ हजार ४९० अर्ज दाखल झाले होते. ३० तारखेला हा आकडा अंतिम व्हायचा होता. उमेदवारांची ही संख्या १० हजारांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एका प्रभागामध्ये एका जागेसाठी तीन ते चार उमेदवार उभे राहण्याची चिन्हे आहेत. ३१ तारखेला अर्जांची छाननी आहे. ४ जानेवारीला नामनिर्देशन परत घेतले जाणार आहे. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक