शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वन आगारातील टेम्पो चोरून भंगारामध्ये ६० हजारात विकला; दीड महिन्यानंतर कारवाई 

By विशाल सोनटक्के | Updated: May 16, 2024 19:39 IST

नांदेड जिल्ह्यातील आरोपींचा समावेश

उमरखेड (यवतमाळ) : अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून वन आगारामध्ये ठेवला होता. सदर टेम्पो १ एप्रिल रोजी चोरीस गेला होता. याप्रकरणातील आरोपींना पकडण्यास दीड महिन्यानंतर यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. आता चोरीचा टेम्पो खरेदी करणाऱ्याचा पोलिस पथक शोध घेत आहे. सदर टेम्पो भंगारात ६० हजारात विकल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

अवैध माती उत्खनन करून वाहतूक करत असताना शंकर पिराजी हरकरे यांचा टेम्पो (क्र. एमएच २७ सी ०५२०) हा वन विभागाच्या पथकाने पकडला होता. कारवाई होईपर्यंत हा टेम्पो नागापूर रुपाला येथील वन आगारात ठेवण्यात आला होता. मात्र, १ एप्रिल रोजी मध्यरात्री आगारातून अज्ञात इसमांनी हा टेम्पो पळवून नेला. या घटनेनंतर वन विभागात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. पथकाने १४ मेच्या रात्री देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. 

या युवकांची विचारपूस सुरू असताना त्यांच्याकडून टेम्पो चोरीचे धागेदोरे मिळाले. नागापूर रुपाला येथील सय्यद समीर सय्यद करीम याने वन आगारातून टेम्पो चोरून नेला. तो शेख सरदार यांच्याकडे टेम्पो घेऊन गेला. शेख याने नांदेड येथील शेख करीम शेख पाशा (रा. देगलूर रोड, नांदेड) याच्या भंगार दुकानात सदर टेम्पो ६० हजार रुपयात विकला होता. देशी कट्टा प्रकरणातील आरोपी शेख वाजीत उर्फ शेख सरदार याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सय्यद समीर सय्यद करीम (रा. नागपूर रुपाला) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने साथीदारांची तसेच टेम्पो विकला त्या भंगार दुकानदाराचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ...या सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्याया प्रकरणात पोलिसांनी सय्यद समीर सय्यद करीम (२०), शाहिद खान जावेद खान (१९), शेख जुबेर शेख जब्बार (१९), मस्तान खान मलंग खान (२०), शेख वाजिद उर्फ शेख सरदार उमर (२४, रा. ताजनगर, हिंगोली नाका नांदेड) आणि भंगार दुकानदार एजाज काजी शिराजुद्दीन काजी (३६, रा. गाडेगाव रोड, इक्बालनगर, नांदेड) या सहा जणांना अटक केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन गजभारे, पोलिस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड आणि पोलिस शिपाई मोहम्मद ताज यांनी पार पाडली. सदर प्रकरणातील टेम्पो अद्याप हस्तगत केलेला नाही. आरोपींच्या अटकेनंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी उमरखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ