शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

तूर लागवड ते खरेदीचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:25 IST

ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.

ठळक मुद्देनेरच्या महिलांचा उपक्रम : ४८ गावांना मिळाली उभारी, थेट मार्केटिंगने फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामीण भागात कृषी उत्पादनावर प्रक्रियाच होत नाही. व्यापारी त्याचा गैरफायदा घेतात. यावर मात करण्यासाठी नेरचा तेजस्विनी प्रकल्प सरसावला आहे. तूर लागवड ते खरेदीपर्यंतचे काम करणाऱ्या या प्रकल्पामुळे ४८ गावांतील महिलांच्या कामांना उभारी मिळाली आहे.नेर तालुक्यातील तेजस्विनी प्रकल्पाने राज्यापुढे एक ओळख निर्माण केली आहे. पै-पै गोळा करणाºया या महिलांनी बचतगट स्थापन केला. या बचतगटाचे २०१६ मध्ये लोकसंचालित साधन केंद्र सुरू करण्यात आले. नेर तालुक्यातील साडेतीन हजार महिला या गटाशी जुळल्या आहेत. त्या दरमहा साडेतीन लाख रुपयांची बचत करीत आहेत. बचतीच्या अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून वितरण करण्यात येते. त्यावर केवळ दीड टक्काच व्याज आकारले जाते. व्याजाची रक्कम बचत खात्यात गोळा होते. हे व्याज महिला वाटून घेतात. यामुळे पूर्वी सावकाराकडे हात पसरणाºया महिलांना आता बचतगटातूनच कर्ज मिळते. २०१७ मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. रंजन वानखडे यांच्या मार्गदर्शनात तूरडाळ प्रकल्प साकारण्यात आला. प्रकल्पात अ‍ॅटोमायझेशन मशिन बसविण्यात आली. यामुळे तुरडाळीला आकर्षक पॅकींग शक्य झाले. येथील तूरडाळीला अ‍ॅमेझॉननेही मागणी नोंदविली आहे. हा प्रकल्प साकारल्यामुळे ४८ गावांतील शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. लोकसंचालित केंद्राच्या कृषीसेवा केंद्रातूनच ते बियाणे खरेदी करतात आणि हंगाम संपल्यानंतर याच महिलांकडून तुरीची खरेदी करण्यात येते. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर गावातच मिळतो.असे आहे व्यवस्थापन मंडळया केंद्रातील व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्ष म्हणून पुष्पा गेडाम तर सचिव म्हणून सुनिता संतोष गडपायले काम पाहत आहेत. उपजीविका समन्वयक म्हणून भारती रणदिवे तर सहयोगिनी म्हणून माया मेश्राम, मिना वानखडे, रेखा वंजारी, जयमाला खडसे, अंजू रंगारी काम पाहत आहेत.