शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

तक्रारीचे निवारण न करताच संघ विभागस्तरावर पाठविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2015 02:18 IST

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत गत दोन वर्षात तीन वेगवेगळे जन्मवर्षी दाखवून खेळणाऱ्या खेळाडुच्या विरोधात ...

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : क्रीडा अधिकाऱ्यांची उर्मट वागणूकयवतमाळ : जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत गत दोन वर्षात तीन वेगवेगळे जन्मवर्षी दाखवून खेळणाऱ्या खेळाडुच्या विरोधात पुराव्यासह तक्रार दाखल करूनही अद्याप निर्णय न देणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने परस्परच निर्णय घेत. त्या संघाला विभागस्तरावर पाठविले. तक्रारकर्त्याने निर्णयाबाबत विचारणा केली असता त्याला उर्मट वागणूक देणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने २४ आॅगस्टला नेहरू स्टेडियम येथे जिल्हास्तर शालेय फुटबॉल (मुली) स्पर्धा घेण्यात आली. अंतिम सामन्यात कोषटवार विद्यालय पुसद विरुद्ध पोदार स्कूल यवतमाळ सामना झाला. सामना झाल्यानंतर यवतमाळ संघाने लगेच पुसद संघातील एका खेळाडुंची तीन वेगवेगळे जन्मवर्ष असल्याची पुराव्यानिशी रितसर तक्रार आयोजकांकडे दिली. नियमाप्रमाणे तीन तासात तक्रारीचे निवारण व्हायला हवे होते. मात्र जिल्हा क्रीडा कार्यालयाने ताबडतोब निर्णय घेतला नाही. ६ सप्टेंबरपासून अकोला येथे विभागीय स्पर्धा असल्याने त्यापूर्वी तक्रारीवर निर्णय होण अपेक्षित होते. मात्र या तारखेपर्यंतही क्रीडा कार्यालयाने कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान तक्रारकर्ते क्रीडा शिक्षक राजेश कळसकर दररोज कार्यालयाशी संपर्कात होते. शेवटी कोणताच निर्णय न आल्याने त्यांनी ६ सप्टेंबरला विभागीय स्पर्धेच्या दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तक्रारीबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी पुसद संघाच्या बाजुने निर्णय झाला असल्याचे सांगितले. पुंड यांनी ही माहिती दिल्यावर तक्रारकर्त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी पुंड यांना हा निर्णय केव्हा झाला? मला निर्णयाची लेखी प्रत दिली नाही वा क्रीडा कार्यालयाने दररोज संपर्कात असूनही मला निर्णय का कळविला नाही, असे विचारले असता पुंड यांनी ‘तू आता आम्हाला शिकवशील का? अशा उर्मट भाषेत तक्रारकर्त्यालाच दटावले. तक्रारकर्त्या क्रीडा शिक्षकाला अद्यापही तक्रारीचा निर्णय क्रीडा कार्यालयाकडून अप्राप्त आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड यांनी तक्रारकर्त्याला विश्वासात न घेता परस्परच निर्णय घेतला. तीन वेगवेगळ््या स्पर्धेत बनावट जन्मवर्ष दाखवून खेळणाऱ्या खेळाडुंबाबत पुरावा देऊन देखील त्यांच्याच बाजुने क्रीडाधिकाऱ्याने परस्परच निर्णय घेतल्याचे आमच्या खेळाडुंवर अन्याय झाला असल्याची तक्रार क्रीडा शिक्षक राजेश कळसकर यांनी जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांच्याकडे दाखल केली आहे. जिल्हाधिकारी या तक्रारीवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)