शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:19 IST

शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात.

ठळक मुद्देशहरी नोकरदार २३ जणांचा उपक्रम : पाच तालुक्यात वैचारिक साफसफाई

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. पण राष्ट्रसंतांच्या विचारांचा पगडा असलेल्या २३ तरुणांनी मात्र ही मानसिक घालमेल संपवून स्वत:चेच नव्हे, तर पाच तालुक्यांतील गावांची भौतिक आणि वैचारिक साफसफाई सुरू केली आहे.टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा अशा नावासह हे तरुण गेल्या चार महिन्यांपासून गावखेड्यांमध्ये काम करीत आहे. घाटंजी, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, दारव्हा या तालुक्यांतील गावे बदलण्याचा विडा या टीमने उचलला आहे. विशेष म्हणजे, आपापल्या नोकऱ्या सांभाळून ही टीम काम करते.प्रत्येक शनिवारी एका खेड्याची निवड करून सर्व तरुण तेथे पोहोचतात. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत हाती खराटा घेऊन ग्रामसफाई करतात. रात्री ७.३० पर्यंत भजनसंमेलन घेऊन गावकºयांपुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ठेवतात. रात्री आठ वाजता सामुदायिक प्रार्थना झाल्यावर हे तरुण कीर्तनकारांची भूमिका पत्करतात. रात्री ११ वाजेपर्यंत हे कीर्तनरुपी प्रबोधन सुरू असते. यात जीवनविकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनांमुळे जीवनात अंध:कार, कृषीतंत्र अशा विषयांवर हे तरुण गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. गावातून शिकून शहरात स्थायिक झालेले नोकरदार पुन्हा गावात येऊन आपल्यासोबत संवाद साधतात, हे बघून गावकºयांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असा या तरुणांचा विश्वास आहे.गेल्या फेब्रुवारीपासून या उपक्रमाची सुरूवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आली. आतापर्यंत डांगरगाव, पाटापांगरा, तिवसाळा, पंगडी, सायतखर्डा, पहापळ, वरझडी, सायखेडा, पांढुर्णा, मांजरी, कवठा, तळणी, वडगाव, कारेगाव, जरूर, कामठवाडा, शिवणी, करमना आदी गावांमध्ये हे तरुण पोहोचले आहेत.टीम आपल्यासाठी ग्रामसफाई करीत असल्याचे पाहून गावकरीही या उपक्रमात सहभागी होतात, हे विशेष. तर शेजारच्या खेड्यातील नागरिक ‘आमच्याही गावात या’ अशी गळ घालतात. नुकताच घाटंजी येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात यवतमाळचे खुशाल ठाकरे, डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. कोठारी, ललित काळे आदींनी या टीमची भेट घेतली.ही आहे ‘टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा’शिवाजी सोयाम, मधुकर गेडाम, अविनाश राऊत, पांडुरंग किरणापुरे, कैलास बगमारे, विलास कोरांगे, गजानन चव्हाण, राजू विरदंडे, छगन पेंदोर, राजू कुंटलवार, सुरेश चौधरी, दिवाकर गेडाम, घनश्याम काटकर, गोवर्धन मेश्राम, प्रदीप जाधव, माणिकदास टोंगे, सुरेश बोपटे, श्रीराम तोडसाम, मोहन शेंडे, चंद्रकांत आडे, गणेश साबापुरे, विष्णू नेवारे, गजेंद्र ढवळे आदी या टीमचे सदस्य आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ