शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या कार्यशाळेत झळकला ‘लोकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 21:13 IST

अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.

ठळक मुद्देघाटंजीत मार्गदर्शन : मुलांकडे लक्ष द्या

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : अल्पवयीन मुले विविध गैरमार्गाकडे वळत असल्याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित केले होते. याच वृत्ताचा आधार घेत येथे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे, असे आवाहन या कार्यशाळेत करण्यात आले.येथील एसपीएम कन्या शाळेत सोमवारी कल व अभिक्षमता समुपदेशन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेकरिता मार्गदर्शक म्हणून किशोर बनारसे, श्याम पंचभाई उपस्थित होते. तालुक्यातील माध्यमिक शाळांचे अविरत प्रशिक्षण घेतलेले मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांची अभिक्षमता कशी तपासायची याबद्दल किशोर बनारसे यांनी तर क्षमता, आवड व संधी यातून करिअर घडविण्यास कशी मदत होते याबाबत पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. तर ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या’ या वृत्ताचा आधार घेऊन मुलांना कसे समजून घेता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. तालुका सुलभक जी.डी.कैटीकवार, गजानन देमापुरे, संगीता मुनेश्वर उपस्थित होते. तर कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी विषय साधनव्यक्ती श्रीकांत पायताडे, आकाश कवासे, मानव लढे, अर्चना मनोहर यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Lokmatलोकमत