शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थेविरुद्ध शिक्षकांनी सावध झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 22:35 IST

सगळी आंदोलने संपली तरी सरकारला जाग येत नाही. शिक्षकांना बाजूला ठेवून शिक्षणप्रक्रिया चालविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देविक्रम काळे : शिक्षक महासंघाच्यावतीने शैक्षणिक परिसंवाद, शिक्षणप्रेमींच्या उपस्थितीत ‘अ‍ॅप’चे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : सगळी आंदोलने संपली तरी सरकारला जाग येत नाही. शिक्षकांना बाजूला ठेवून शिक्षणप्रक्रिया चालविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. याची किंमत शासनाला चुकवावी लागेल. शिक्षकांना वाचविण्यासाठी अविरत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे मत औरंगाबादचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केले.शिक्षक महासंघाच्या वतीने यवतमाळ येथील संदीप मंगलम्मध्ये शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार काळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ‘आजच्या शिक्षण व्यवस्थेची दशा व दिशा’ या विषयावरील या परिसंवादात प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर, संस्थाचालक महामंडळाचे विदर्भ अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, सावरगाव येथील वसंत शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रवीण देशमुख, पुसदच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुद्ध चोंढीकर, देवराव पाटील ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे मनीष पाटील, पुसदच्या युवक शिक्षण संस्थेचे सचिव विजय जाधव, बाभूळगावच्या सुदाम शिक्षण प्रसारक मंडळाचे कृष्णा कडू, बाळासाहेब धांदे, पद्माकर राऊत, खान, जयंत पाटील, बी.जी.राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षण व्यवस्था वाचविण्यासाठी आणि बहुजनांना शिक्षण मिळावे हाच परिसंवादाचा हेतू असल्याचे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी सांगितले. संस्थाचालकांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली असून शासन मात्र शिक्षण व्यवस्थेला बाजारात उभे करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप प्रा. प्रवीण देशमुख यांनी केला. विनाअनुदानित हे तत्व फक्त शिक्षणक्षेत्रातच का, असा सवाल वसंतराव घुईखेडकर यांनी उपस्थित केला. परिसंवादाच्या निमित्ताने सर्व शिक्षणप्रेमी एकत्र आल्याची भावना महेश करजगावकर यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षक महासंघाच्या अ‍ॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अ‍ॅपबद्दल अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू यांनी माहिती दिली. अमरावती येथील दृष्टिहीन कलावंतांच्या सुमधूर गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परिसंवादाचे संचालन देवेंद्र आत्राम, तर आभार यवतमाळ जिल्हाध्यक्ष नीलेश तायडे यांनी मानले.