शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

शिक्षकांनी झिडकारली आॅनलाईन कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:48 IST

शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत.

ठळक मुद्देजिल्हाभरात सत्याग्रह : कृती समितीच्या छत्रछायेत एकवटल्या सर्व संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांपुढे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तर शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रूपमधून अधिकाºयांना धडाधड काढून टाकण्यात आले.शिक्षक संघटना समन्वय कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन तालुका समन्वय समिती तयार करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून स्थानिक पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे, पुरुषोत्तम ठोकळ यांनी दिली.आॅनलाईन कामांसाठी प्रत्येक केंद्रावर डाटा एंट्री आॅपरेटर व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनची व्यवस्था करण्यात यावी, पोषण आहाराचा धान्यादी किराणामाल शासनानेच पुरवावा, मुख्याध्यापकावर खरेदीची सक्ती करण्यात येऊ नये, अधिकाºयांनी मोबाईलवर आदेश पाठवू नये, लेखी स्वरुपात पाठवावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बहिष्काराचा पुढील टप्पा म्हणून ९ आॅक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन होणार आहे. त्यादृष्टीने ५ आॅक्टोबर रोजी सर्व तालुका समन्वयकांची सभा जिल्हा परिषद गार्डन येथे होणार आहे.यवतमाळ पंचायत समितीसमोर जिल्हा समन्वयक रवींद्र कोल्हे यांच्यासह मधुकर काठोळे, मनोज रामधनी, ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर, राजूदास जाधव, विनोद गोडे, रमाकांत मोहरकर, दिगांबर जगताप, सुभाष धवसे, गजानन पोयाम, प्रकाश सालपे, महेंद्र वेरुळकर, नंदकिशोर वानखडे, विनोद डाखोरे नदीम पटेल, साहेबराव पवार आदी उपस्थित होते. पांढरकवड्यात शिक्षकांनी आमदार राजू तोडसाम यांना निवेदन दिले. मारेगाव पंचायत समितीसमोर झालेल्या आंदोलनात तालुका समन्वयक विठ्ठलराव ठावरी, दिवाकर राऊत, तुषार आत्राम, धर्मराज सातपुते, चंद्रकांत सुके, धवस, हरीष दरबेशवार, संतोष बोरकर, संजय फुलबांधे, हिरामण आगे आदींनी पुढाकार घेतला. तर नेर येथे सतपाल सोवळे, प्रवीण राणे, गणेश देऊळकर, भगवंत राऊत, प्रदीप खंडारकर, विठ्ठल आरू, नंदकिशोर वानखडे, दिनेश कडू, दर्पण माळवी, चंद्रशेखर तिखे आदी आदींनी सत्याग्रह केला.आर्णी येथे जिल्हा समन्वय समितीचे राजुदास जाधव, तालुका समन्वयक सुदर्शन चव्हाण, प्रकाश हटवारे, राजू परमार, प्रदीप नागापुरे, राजकुमार खोंडे, एन. आय. खान, गजानन जगताप, सुरेश कुडसंगे, संतोष मरगडे, अबरार बेग मिर्झा आदींचा सहभाग होता. सूत्रसंचालन आसाराम चव्हाण यांनी तर आभार बबनराव मुंडवाईक यांनी मानले.कळंब येथे उत्तम पवार, गौतम कांबळे, जयवंत डुबे, सुनिल भोयर, अजय अक्कलवार, दीपक चांदोरे, मंदार पुंडशास्त्री, प्रवीण कापर्तीवार, बाबा घोडे, विकास दरणे, जगदीश ठाकरे, नरेंद्र धोबे, महेश खोडके, यशोदा नामुर्ते, प्रियंका राऊत, पाशा गट्टवार, रमेश बरडे, प्रशांत उमरतकर, संजय आसूटकर, योगेश बोदडे, वनिता वानखडे, पवन लेंडे, कविता उईके, नंदा झगडे सहभागी होते. राळेगावातही सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षकांनी सहभाग घेतला.