शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक महासंघाचे मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:48 IST

गृहविभागाप्रमाणे सर्व शिक्षकांना रोकड विरहित वैद्यकीय बिलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी,

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गृहविभागाप्रमाणे सर्व शिक्षकांना रोकड विरहित वैद्यकीय बिलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ‘अ’प्रमाणे कार्यवाही करुन तपासून सादर करण्याचे आदेश उपसचिवांना दिल्याचे भोयर यांनी सांगितले.सध्या शिक्षकांनी उपचार घेतल्यानंतर व जवळची रक्कम रुग्णालयात दिल्यानंतर शासनाकडे बिल सादर करण्यात येते. त्यानंतर त्यांनी अदा केलेली रक्कम परत मिळते. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट असून यात बराच वेळ खर्च होतो. बºयाच शिक्षकांची बिलाची प्रकरणे २-३ वर्षे शासनदरबारी पडून राहतात. त्यामुळे शिक्षक महासंघातर्फे कॅशलेस योजनेची मागणी केली. नगरपालिका, मनपा शिक्षकांनाही वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्याची मागणी केली. सत्र २०१०-११, २०११-१२ व २०१२-१३ मध्ये नैसर्गिक वाढ मिळालेल्या तुकड्यांना अनुदान देण्यात यावे, २ मे २०१२ नंतरच्या अनेक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या, परंतु, यात शिक्षकांची चूक नाही. त्यामुळे त्यांना पूर्ववत सेवेत घ्यावे, उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविलेल्या शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते उघडावे, आरटीईचे उल्लंघन करुन उघडलेला पाचवा व आठवा वर्ग मंत्रालयीन स्तरावर निर्णय घेऊन बंद करावा आदी मागण्या करण्यात आल्या. १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मूल्यांकन पात्र उच्च माध्यमिक विद्यालयाच्या याद्या लवकरच घोषित केल्या जातील, असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्याचे भोयर यांनी सांगितले.