शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:19 IST

शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतरही यवतमाळ पंचायत समितीत अद्याप वेतननिश्चिती झाली नाही. यामुळे सोमवारी शिक्षक संघाने पंचायत समितीसमोर धरणे दिले.

ठळक मुद्देयवतमाळ पंचायत समितीची दिरंगाई : शिक्षक संघाच्या पुढाकारात धरणे, तर सोमवारपासून बेमुदतचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासन निर्णयानुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झाल्यानंतरही यवतमाळ पंचायत समितीत अद्याप वेतननिश्चिती झाली नाही. यामुळे सोमवारी शिक्षक संघाने पंचायत समितीसमोर धरणे दिले.यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे सातव्या वेतन आयोगानुसार मे महिन्याचे वेतन थकबाकीसह अदा करावे, यासाठी पाठपुरावा केला. यवतमाळ पंचायत समितीने यानंतरही वेतननिश्चिती केली नाही. त्यामुळे शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मदन पराते यांच्या नेतृत्त्वात पंचायत समितीसमोर धरणे दिले. गटशिक्षणाधिकारी शेषराव राठोड, विस्तार अधिकारी श्रीकृष्ण खोब्रागडे आणि प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली. यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २४ मेपर्यंत वेतननिश्चितीचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यानंतरही हा प्रश्न कायम राहिल्यास २७ मेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनात मदन पराते, सुरेश नरवाडे, श्रीराम जिड्डेवार, शेख लुकमान, असाराम चव्हाण, गौतम कांबळे, नदीम पटेल, दीपक चौधरी, दिलीप हातगावकर, रविनाश राठोड, किशोर रननवरे, सचिन सानप, संजय वनकर, प्रफुल्ल माळोदे, केशव ठोंबरे, मेहबूब शेख, श्याम कन्नाके, संजय वाघमारे, प्रवीण कापर्तीवार, संजय उईके, संतोष राठोड, प्रमोद घावडे, रमेश जिड्डेवार, अमन शेंडगे, सुनील मनवर, प्रवीण जाधव, सुदाम चव्हाण, अरुण डोंगरे, हिरालाल राठोड, पवन लेडे, संजय आडे, गजानन हागोने, संतोष सोने आदी सहभागी झाले होते.नेर येथे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदननेर : विविध मागण्यांना घेऊन सोमवारी येथे शिक्षकांनी धरणे दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ नेरच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. मे महिन्याची वेतन देयके थकबाकीसह जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठविण्याचा आदेश होता. मात्र नेर पंचायत समितीने वेतन निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही. ही प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मे महिन्याच्या वेतनात अदा करावी यासह स्थानिक पातळीवरील प्रश्नांना घेऊन देऊन गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण राणे, सचिव दिनेश कडू, राजेंद्र राणे, कृष्णा आगासे, नितीन मासाळ, केशव टेंबरे, राजेंद्र नहार, सुरेश कुलरकर, गजानन गवई, गजानन चेर, राहुल मिस्कीन, प्रदीप गाडेराव, धनंजय भांडारकर, जगदीश खाडे, प्रवीण देशमुख, अशोक मेश्राम, एकनाथ वासनिक, सुधाकर यावले, अरुण महल्ले, नंदकिशोर अलोणे, पंडित वैद्य, रवींद्र भांडे, नितेश गुप्ता, अमित इखार, एकनाथ कुकडे, राजेंद्र माहुरे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.