शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

शिक्षक चाबी विसरले, अन् विद्यार्थ्यांना सुटी मिळाली

By admin | Updated: July 18, 2016 01:07 IST

शिक्षक चाबी आणायचे विसरले अन् विद्यार्थ्यांना अघोषित सुटीच मिळाली. त्यातच मुख्याध्यापकही आले नाही.

शेंबाळपिंपरीचा प्रकार : मुख्याध्यापकानेही मारली बुट्टी शेंबाळपिंपरी : शिक्षक चाबी आणायचे विसरले अन् विद्यार्थ्यांना अघोषित सुटीच मिळाली. त्यातच मुख्याध्यापकही आले नाही. हा संतापजनक प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे शनिवारी घडला. सकाळच्या शाळेसाठी आलेले विद्यार्थी ज्ञानार्जनाशिवायच परत गेले. शेंबाळपिंपरी येथे केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे १६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. मुख्याध्यापकासह पाच शिक्षक कार्यरत आहे. त्यातील काही शिक्षक पुसद तर काही उमरखेडवरून जाणे येणे करतात. शुक्रवारी या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांंना चाबी देणे विसरले. मुख्याध्यापक शनिवारी काही कामानिमित्त शाळेत आले नाही. परिणामी शाळेला कुलूप होते. विद्यार्थी, शिक्षक गोळा झाले. परंतु शाळाच उघडली नव्हती. बराच वेळ प्रतीक्षा करून विद्यार्थी घराकडे निघून गेले. तर शिक्षक त्याच ठिकाणी ताटकळत थांबले. येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक कधीच वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे शाळा उशिरा उघडण्याचे प्रकार नेहमीच घडतात. परंतु शनिवारी चक्क सुटीच द्यावी लागली. हा प्रकार माहीत होताच सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शाळेत पोहोचले. मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळानंतर केंद्र प्रमुख या ठिकाणी पोहोचले. मात्र मुख्याध्याप आलेच नाही. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)