शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

शिक्षक संचमान्यतेचे गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: February 27, 2017 00:51 IST

प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते.

आॅनलाईन खेळखंडोबा : परीक्षेच्या तोंडावर दुरुस्तीचा सोपस्कार अविनाश साबापुरे  यवतमाळ प्रत्येक विद्यार्थ्याकडे योग्य लक्ष देऊन अध्यापन करता यावे, यासाठी शिक्षकांची संचमान्यता केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची संचमान्यता कुचकामी ठरत आहे. परीक्षा तोंडावर आली तरी अनेक शाळांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. आता ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षण संचालकांनी संचमान्यतेत दुरुस्ती करण्याचा देखावा निर्माण केला आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार योग्य राखण्यासाठी संचमान्यता केली जाते. त्यासाठी पूर्वी एखाद्या शाळेत किती विद्यार्थी आहेत, याची पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून प्रत्यक्ष पाहणी केली जात होती. मात्र आता शाळांनी सरल प्रणालीत भरलेल्या माहितीवरच विश्वास ठेवून संचमान्यता केली जात आहे. परिणामी, गेल्या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यतेत प्रचंड चुका झाल्या आहेत. संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिलेल्या संचमान्यतेवर हजारो शाळा असमाधानी आहेत. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रांतील संचमान्यता चुकीची असल्याचा उलगडा शिक्षण संचालनालयाला झाला आहे. आता विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. मार्च एडिंगपूर्वी वेतनअनुदान वितरित करण्याचे निर्देश आहे. परंतु, संचमान्यता दुरुस्त केल्याशिवाय वेतन अनुदान देता येणे शक्यच नाही. आणि अनुदान वितरित केले नाही किंवा व्यपगत झाल्यास कारवाईचा बडगा संचालकांसह शिक्षणाधिकाऱ्यांवर उगारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर संचमान्यता दुरुस्तीचे शिबिर २७ फेब्रुवारीपासून पुण्यात घेण्यात येत आहे. यात पहिल्या दिवशी पुणे, अमरावती, २८ रोजी कोल्हापूर, नागपूर, २ मार्चला मुंबई, औरंगाबाद आणि ३ मार्चला नाशिक, लातूर विभागातील संचमान्यतांमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१२ ते २०१७ या पाच शैक्षणिक सत्रांतील विद्यार्थीसंख्या, मान्य पदे, पायाभूत पदे आदी माहिती घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांना पुण्यात बोलावण्यात आले आहे. संचमान्यता करूनही गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात शिक्षक मिळाले नाही. यंदा संपूर्ण सत्र संपल्यानंतर ऐन परीक्षेच्या काळात एखाद्या शाळेला शिक्षक मिळाला तरी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता संचमान्येत दुरूस्ती कधी होते, याकडे लक्ष आहे.