शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या मोबदल्यातून टीडीएस कपात

By admin | Updated: May 25, 2017 01:24 IST

वेकोलिच्या कोलार पिंपरी विस्तारीत खुल्या कोळसा खाणीमध्ये अहेरी गाव अधिग्रहीत करण्यात आले.

अहेरीवासीयांनी धनादेश नाकारले : वेकोलिने घरे केली उद्ध्वस्त, गावकरी झाले बेघरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : वेकोलिच्या कोलार पिंपरी विस्तारीत खुल्या कोळसा खाणीमध्ये अहेरी गाव अधिग्रहीत करण्यात आले. गावकऱ्यांना त्यांच्या घराचा व खुल्या जागेचा मोबदला देताना त्यामधून १० ते २० टक्के आयकर कपात (टीडीएस) करण्यात आल्याने गावकरी वेकोलि प्रशासनावर संतप्त झाले. अखेर मंगळवारी होणारा धनादेश वितरणाचा सोहळा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की वेकोलि प्रशासनावर आली. धनादेश वितरण कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाही आल्यापावली भालरवरून परत जावे लागले.वेकोलिच्या कोलार पिंपरी खुल्या कोळसा खाणीचे विस्तारीकरण करण्यात आले. या प्रकल्पामध्ये अहेरी गावठाणाच्या खाणी कोळसा असल्याने गावाचे पुनर्वसन होणे गरजेचे होते. वेकोलिने गावातील घरांचे व खुल्या जागेचे मुल्यांकन करून त्याच्या मोबदल्याचे धनादेश तयार केले. मात्र मोबदल्याच्या एकुण रकमेतून आयकर कपात करून धनादेश बनविण्यात आले. ज्या व्यक्तीकडे पॅनकार्ड असेल, त्यांची १० टक्के व पॅनकार्ड नसणाऱ्यांच्या रक्कमेतून २० टक्के कपात करण्यात आली. मंगळवारी या ३०० प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांच्या धनादेश वितरण सोहळा वेकोलिने आयोजित केला. कार्यक्रमाची संपूर्ण तयारीही करण्यात आली. धनादेश वितरणासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा हेसुद्धा भालर येथे पोहोचले. लाभार्थी अहेरी गाववासी धनादेश घेण्यासाठी हजर झाले. मात्र रकमेतून टीडीएस कापल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यामध्ये धुसपूस सुरू झाली. मिळणारा मोबदला हे उत्पन्न नसतानाही त्यावर आयकर लागतोच कसा? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपविभागीय अधिकारी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नियमांची पुन्हा पडताळणी करा व टीडीएस न कापता मोबदला देता येईल काय, याची खात्री करून धनादेश नव्याने तयार करा, त्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी चार-सहा दिवस धीर धरावा, अशी विनंती आमदार बोदकुरवार यांनी केली. त्यामुळे धनादेश वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की वेकोलिवर आली.आम्हाला निवारा द्याघरांचा मोबदला देण्याआधीच वेकोलिने आमची घरे उद्ध्वस्त का केली? आता वेकोलिने आम्हाला निवाऱ्याची सोय करून द्यावी, पाण्यापावसाच्या दिवसात आम्ही मुलेबाळे कोठे ठेवावी? अशा प्रश्नांचा भडीमार प्रकल्पग्रस्तांकडून वेकोलि अधिकाऱ्यावर होत होता. वेकोलि अधिकाऱ्यांच्या मुजोरीपणाबद्दलही गावकऱ्यांकडून तक्रारी मांडण्यात आल्या. काही शेतकऱ्यांना शेताचा मोबदलाही अजून वेकोलिने दिला नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. मंगळवारी अहेरी गावच्या २९९ व्यक्तींना २० कोटी रूपयांचे वितरण केले जाणार होते. आता गावकऱ्यांना धनादेश कधी मिळणार? आयकर कपात न होता धनादेश मिळेल काय? याबाबत कुणीही अधिकारी काहीही बोलायला तयार नाही.