शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेची कर वसुली १० टक्क्यांवर

By admin | Updated: January 15, 2015 22:58 IST

नगरपरिषदेच्या कर वसुलीला घरघर लागली असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा टक्के म्हणजे एक कोटी ५० लाख रुपयांचीच कर वसूली झाली आहे. प्रत्यक्ष ११ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट होते.

यवतमाळ : नगरपरिषदेच्या कर वसुलीला घरघर लागली असून डिसेंबर अखेरपर्यंत केवळ दहा टक्के म्हणजे एक कोटी ५० लाख रुपयांचीच कर वसूली झाली आहे. प्रत्यक्ष ११ कोटी २५ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नगरपरिषदेची करवसुली चिंताजनक होत आहे. कर विभागातून वसुलीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात एकूण ३१ हजार मालमत्ता आहे. त्यांच्याकडून ११ कोटी २५ लाख इतका कर वसूल होणे आवश्यक आहे. यामध्ये चालू वर्षातील कर पाच कोटी सहा लाख इतका आहे. थकीत करावर पाच कोटींचा दंड लागला आहे. तर दोन कोटींच्या कराबाबत न्यायालयात खटले सुरू आहे. अशा स्थितीत कर वसुलीची मोहीम राबविताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. कर्मचारी केवळ पाच कोटी सहा लाखांचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन वसुली मोहीम राबविताना दिसतात. २०१२-१३ मध्ये चार कोटी ६९ लाख म्हणजे ४० टक्के वसुली झाली होती. त्यानंतर २०१३-१४ मध्ये चार कोटी २४ लाख वसुली झाली. यावर्षी पाच टक्क्याने वसुलीत घट झाली. आता पुन्हा ११ कोटी २५ लाखांचे उद्दीष्ट असून जवळजवळ दीड कोटी रुपये वसूल झाले आहे. ६५ टक्केपेक्षा अधिक कर वसुली असलेल्या नगरपरिषदांना केंद्र शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून विकासासाठी भरघोस निधी दिला जातो. या निधीमुळेच शहराचा सर्वांगीण विकास करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून यवतमाळ नगरपरिषदेला वित्त आयोगाच्या निधीशिवाय दुसऱ्या कुठल्याच योजनेचा लाभ घेता आला नाही. नागरिकांनी जबाबदारी ओळखून शहर विकासासाठी कर नियमित भरणे आवश्यक झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)