शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेने पीककर्ज ‘ओटीएस’ अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:24 IST

कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा अधिक कर्जासाठी वनटाईम सेटलमेंट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. यामुळे ३१ मार्चपर्यंत वनटाईम सेटलमेंट योजना राबविणे अवघड बाब ठरणार आहे.

ठळक मुद्दे३१ मार्चनंतर मुदत संपणार : धोरणात्मक निर्णयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी योजनेत दीड लाखांपेक्षा अधिक कर्जासाठी वनटाईम सेटलमेंट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. यामुळे ३१ मार्चपर्यंत वनटाईम सेटलमेंट योजना राबविणे अवघड बाब ठरणार आहे.या स्थितीवर मात करण्यासाठी योजनेला मुदतवाढ गरजेची आहे. मात्र आचारसंहितेमुळे राज्य शासनाला निर्णयही घेता येणार नाही. या प्रकारात योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली. दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी वनटाईम सेटलमेंट योजनेतून फायदा होणार आहे.मुळात शेतकºयांकडे हजार रुपयांची रक्कम गोळा करण्यासाठी पैसा नाही. या स्थितीत अधिक रक्कम आणायची कुठून हा मूळ प्रश्न आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा शेतकºयांचा आकडा जिल्ह्यात मोठा आहे. हे शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र असले तरी, शासकीय निकषांमुळे असे पात्र शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जाचक अटींनी वंचितांची संख्या वाढलीकर्जमाफी योजनेत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला. सोबतच जाचक अटी ठेवण्यात आल्या. यामुळे या योजनेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. आचारसंहितेमुळे मुदत संपणाऱ्या योजनेत अनेकांना पैशाअभावी सहभाग घेता येणार नाही. त्याला मुदतवाढ देण्याची प्रक्रियाही राबविता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने आर्थिक कोंडी होण्याचा धोका वाढला आहे.