शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
3
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
4
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
5
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
6
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
7
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
8
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
9
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
10
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
11
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
12
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
13
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
14
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
15
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
16
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
17
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
18
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
19
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
20
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 

वृषभचा गळा चिरल्यावरही तोंडावर टाकला दगड

By admin | Updated: July 6, 2016 02:52 IST

वृषभ चौधरीवर कारमध्ये चाकूने वार करून अर्धमेल्या अवस्थेत कोळंबी फाट्यावर फेकण्यात आले.

कोळंबी फाट्याचे प्रकरण : खुनात वापरलेले शस्त्र यवतमाळातून जप्तअकोलाबाजार : वृषभ चौधरीवर कारमध्ये चाकूने वार करून अर्धमेल्या अवस्थेत कोळंबी फाट्यावर फेकण्यात आले. ठार झाल्याची खात्री करण्यासाठी त्याचा गळा चिरुन त्याच्या तोंडावर मोठा दगड टाकल्याची कबुली वडगाव जंगल पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी दिली आहे.यवतमाळ येथील धनश्रीनगरातील वृषभ सुधाकर चौधरी याचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी यश दिलीप छतवाणी, गोलू उर्फ अनिकेत बोरले, ऋषिकेश पुरुषोत्तम गडमडे या तिघांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडी घेतली आहे. या तिघांनी अंगावर शहारे येईल अशा पद्धतीने वृषभचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अंकितच्या आई व बहिणीकडे वृषभ वाईट नजरेने पाहत असल्याने त्याचा खून केल्याचे या तिघांनी पोलिसांना सांगितले. घटनेच्या दिवशी कार चालक यश छत्ताणी याने चिंतामणी दर्शनाला जाण्यासाठी पुजारी भगवतीप्रसाद दुबे यांची इंडिगो कार भाड्याने घेतली होती. सायंकाळी ६.३० वाजता यशने वृषभला फोन करून पांढरकवडा रोडवर बोलाविले. वृषभची दुचाकी एका धाब्यावर ठेऊन कारच्या समोरच्या सीटवर बसविले. तेथून ७.३० वाजताच्या दरम्यान बायपासने अकोलाबाजार रस्त्याकडे गाडी वळविण्यात आली. त्यावेळी वृषभने आपण कोठे चाललो असे विचारल्यावर फिरुन येऊ असे अंकितने सांगितले. थोडे अंतर गेल्यावर वृषभच्या डोळ्यात तिखट फेकण्यात आले. डोळे चोळत वृषभ खाली वाकतानाच त्याच्या पाठीत धारदार चाकूने सपासप वार केले. एक वार पोटातही करण्यात आला. कोळंबी फाट्याजवळ जंगलात कार थांबवून वृषभचे पाय ओढून त्याला रस्त्यालगत फरफटत नेले. त्यावेळी वृषभ जीवंत होता. त्यामुळे पुन्हा त्याचा चाकूने गळा चिरण्यात आला. एवढ्यावरही मारेकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी बाजूचा मोठा दगड उचलून अंकितच्या तोंडावर टाकला. मरण पावल्याची खात्री झाल्यानंतरच तिघे तेथून पसार झाले, अशी माहिती पोलीस कोठडीतील तीनही आरोपींनी वडगाव जंगल पोलिसांना दिली आहे. घटनेत वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी वडगाव जंगल पोलीस यवतमाळ येथील आरोपीच्या घराचा शोध घेतला. त्यावेळी सिव्हील लाईन मधील जुन्या वाड्यातून पोलिसांनी चाकू जप्त केला. दरम्यान वृषभचा एक मोबाईल पोलिसांनी आरोपी ऋषिकेशच्या घरातील कपाटातून जप्त केला तर दुसरा मोबाईल गोदामफैलातील सांडपाण्यात फेकून दिल्याचे सांगण्यात आले. आरोपींनी रक्ताने माखलेले आपले कपडे जाळून नाल्यात फेकले आहे. अधिक तपास वडगाव जंगलचे ठाणेदार प्रकाश राऊत, पोलीस उपनिरीक्षक हसन पठाण, एएसआय हनुमान सातघरे, बालाजी ससाने, प्रदीप थोरात, विजय मानकर, प्रेमदास खुलके, हरिभाऊ ठाकरे, महिपाल राठोड, नकूल रोडे, राजू मुत्यलवार, मधुकर पवार करीत आहे. (वार्ताहर)