शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

By admin | Updated: July 3, 2016 02:27 IST

खासगी बँकेतील रोखपालाचा निर्घृण खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

घाटंजी बायपासवर मारले : तीन आरोपींना पोलीस कोठडी अकोलाबाजार : खासगी बँकेतील रोखपालाचा निर्घृण खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात यवतमाळातून तिघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.वृषभ सुधाकर चौधरी (३०) रा. धनश्रीनगर पिंपळगाव याचा धारदार चाकूचे ३२ वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे प्रेत कोळंबी शिवारातील जंगलात गुरुवारी सकाळी आढळून आले होते. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने सायबर सेलमधील कविश्व पाळेकर यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोपींचा माग काढला. यात यश दिलीप छतवाणी (२०) रा. सिव्हील लाईन यवतमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर गोलू उर्फ अनिकेत बोरले (२०) रा. चमेडियानगर, ऋषिकेश पुरुषोत्तम गडमडे (१९) रा. गोदाम फैल या दोघांना यशने दिलेल्या माहितीवरून अटक केली. ही करवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकातील इक्बाल शेख, नीलेश राठोड यांनी केली.या तिघांना वडगाव जंगल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी वडगाव जंगलचे ठाणेदार राऊत यांनी आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत वापरलेली इंडिगो कार क्र. एम.एच.४३-एन-८५८ जप्त करण्यात आली. सदर कार भगवतीप्रसाद दुबे या पुजाऱ्याच्या मालकीची असून त्यावर यश छतवाणी हा चालक म्हणून होता. या तिघांनीच ही गाडी किरायावर घेतली होती. दरम्यान यश छतवाणी याने घटनेच्या दिवशी २९ जून रोजी मोबाईलवर संपर्क साधून वृषभला यवतमाळ येथील पांढरकवडा मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ बोलाविले. तेथून या तिघांनी एका बारमध्ये मद्यप्राशन केले. त्यानंतर वृषभची दुचाकी तेथेच ठेऊन घाटंजी बायपासकडे गेले. वाहनातच वृषभवर धारदार चाकूने तब्बल ३२ वार करण्यात आले. त्याचा गळाही चिरण्यात आला. यानंतर हा मृतदेह कोळंबी जंगलात फेकण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. वृषभचा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. सध्या तीनही आरोपी यवतमाळ शहर ठाण्याच्या पोलीस कोठडीत असून पोलीस त्यांच्याकडून या खुनाची माहिती घेत आहे. (वार्ताहर)