शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तारिक लोखंडवालास अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 21:55 IST

राळेगाव तालुक्याच्या वाऱ्हा येथील रेती घाटावर मारहाण, हवेत गोळीबार करून मशीन जाळल्या प्रकरणात मो. तारिक मो. शमी लोखंडवाला याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गौण खनिज व रेती घाट संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव तालुक्याच्या वाऱ्हा येथील रेती घाटावर मारहाण, हवेत गोळीबार करून मशीन जाळल्या प्रकरणात मो. तारिक मो. शमी लोखंडवाला याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याकडे करण्यात आली आहे.जिल्हा गौण खनिज वाहतूक व रेती घाट संघटनेचे अध्यक्ष सचिन महल्ले, उपाध्यक्ष कृष्णा ढाले, सचिव सगीर अन्सारी, मुन्ना सिद्दिकी, सचिन दरणे यांच्या नेतृत्त्वात निवेदन सादर करण्यात आले. १० ते १२ जणांनी वाºहा ग्रामपंचायत हद्दीतील घाट क्र.२ वर धुमाकूळ घातला. आधी घाट घेऊ नये म्हणून धमक्या देण्यात आल्या. नंतर पाच लाखांच्या खंडणीसाठी मारहाण करून मशीन जाळण्यात आली. यावेळी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून चार ते पाच जण फरार आहेत. तारिक लोखंडवाला हा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सागीर खान वहीद खान, मुन्ना उर्फ शेख नजमून निसा शेख यांनाही अटक करण्याची मागणी करण्यात आली. लोखंडवाला व साथीदारांपासून आपल्या व कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याचे सचिन महल्ले यांनी म्हटले आहे. त्यांच्या रेती घाटावरील दिवाणजी प्रशांत महल्ले व त्यांचा सहकारी अक्षय पालकर यांना मारहाण करण्यात आली होती. या निवेदनावर सचिन घोडे, किरण खडसे, सुभाष भोयर, प्रशांत डगवार, पंकज कोल्हे, राहुल इंगोले, शेख वसीम शेख मोहम्मद, साबीर बेग, सचिन भोयर, मिथून खाडे, अनिल लडके व संघटनेतील ५० पेक्षा अधिक सदस्यांच्या स्वाक्षºया आहेत.