शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जवळा तलाठी कार्यालयात लागले दरपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:14 IST

तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते.

ठळक मुद्देइतरांपुढे ठेवला आदर्श : अनेक कामांसाठी पैसेच लागत नाही, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

हरीओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते. याला छेद देत तालुक्यातील जवळा येथील तलाठ्याने प्रत्येक कामाचे दरपत्रक प्रकाशित करून पारदर्शीपणाचा प्रत्यय दिला आहे.शेतीशी संबंधित विविध प्रमाणपत्र, कागदपत्रे, सात-बारा, फेरफार, नाव नोंदणी, नाव काढणे आदी कामे गावपातळीवर तलाठी करतो. या कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे येरझारा माराव्या लागतात. ही कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे देण्यासाठी शासनाने शुल्क ठरवून दिले आहे. मात्र शुल्क भरूही शेतकरी, नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाही. परिणामी अनेकदा जादा पैसे मौजून प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. त्यासाठीच अनेक तलाठी शेतकरी, नागरिकांना मुद्दाम त्रास देतात. अखेर हेलपाट्यांना त्रासून शेतकरी जादा पैसे देऊन काम करवून घेतात, असे सर्वत्र सांगितले जाते.अनेकदा तर तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाºयांचेही खिसे भरावे लागतात. यातून आर्थिक लूट होते, अशी ओरड असते. यातून अनेकदा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीतही सापडतात. मात्र त्यांची लाच घेण्याची प्रवृत्ती काही कमी होत नाही. फेरफारसाठी तर हमखास लाच द्यावी लागते, असा शेतकºयांचा अनुभव आहे. मात्र जवळा येथील तलाठी शाम रणनवरे यांनी शेतकºयांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, त्यांना कोणत्या कामासाठी व प्रमाणपत्रासाठी नेमके किती शुल्क लागते, याची माहिती व्हावी म्हणून आपल्या कार्यालयात चक्क दरपत्रकच लावले. त्यातून अनेक कामांसाठी पैसेच लागत असल्याचे वास्तवही समोर आले. यामुळे शेतकºयांची पिळवणूक थांबली आहे.इतरांनी आदर्श घ्यावातलाठी रणनवरे यांच्या या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. इतरही तलाठ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यालयात शाम रणनवरे यांच्याप्रमाणे शासकीय दरपत्रक लावावे, अशी अपेक्षा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनीही व्यक्त केली आहे.