शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट लाखाचे अवघ्या 13 हजार नागरिकांनाच मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या मोहिमेचा भाग म्हणूनच शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या अभियानाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. पर्यायाने १३ हजार नागरिकांनाच लस मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लसीकरणात राज्याच्या तुलनेत जिल्हा पिछाडीवर आहे. त्यामुळेच या मोहिमेला गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, नियोजनाचा अभाव तसेच नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे माहितीच न पोहोचल्याने अवघ्या १३ हजार नागरिकांना लस मिळाली.राज्यातील अनेक जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे. मात्र, यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यात आहे. मात्र, त्यानंतरही यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच पुन्हा पुढे आले. ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. या मोहिमेचा भाग म्हणूनच शुक्रवारी एकाच दिवशी एक लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, या अभियानाची पुरेशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. पर्यायाने १३ हजार नागरिकांनाच लस मिळाली.दरम्यान, मोहिमेला गती देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, याशिवाय मोठे गाव, प्रभाग अशा ठिकाणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळपासून लसीकरणासाठी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जे गाव ९० टक्के लसीकरण पूर्ण करेल, अशा गावाला जिल्हा परिषद एक लाख रुपयाचा पुरस्कार देणार आहे. १६ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींची त्यासाठी निवड झाली आहे. एकापेक्षा जास्त गावे या कॅटेगिरीमध्ये आली, तर ईश्वर चिठ्ठी काढून पारितोषिक दिले जाणार असून सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडीताई, आशा यांचा गौरव केला जाणार आहे.

म्हणे, सोयाबीन, कापसामुळे लसीकरणाला अडथळामिशन कवच कुंडल सप्ताहाबाबत पुरेशी जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळेच शुक्रवारी ३०६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करूनही एक लाखाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले. दरम्यान, गावामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, लसीकरणापासून वंचित राहिलेला मजूर वर्ग कापूस वेचण्यासाठी शेतात आहे. सोयाबीन काढणीचेही काम सुरू असल्याने मिशन कवच कुंडलला अडथळा निर्माण झाल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आता समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. दुर्गोत्सव मंडळ आणि इतर ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. येथे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

लसीकरणासाठी यंत्रणेने सांघिक प्रयत्न करावा - विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शुक्रवारी नियोजन भवनमध्ये महसूल व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण वाढविण्यासाठी महसूल व इतर सर्व विभागांनी मदत करावी. सांघिक प्रयत्नातूनच लसीकरण वाढेल, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, आयुक्तांनी या बैठकीत शासकीय महसूल वसुली, रेतीघाट लिलाव सद्यस्थिती, जमीन महसूल अधिनियमाची अंमलबजावणी यासह इतर बाबींचा आढावा घेतला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या