शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अभयारण्यातील वनौषधी तस्करांच्या निशाण्यावर

By admin | Updated: November 30, 2014 23:14 IST

पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश

उमरखेड (कुपटी) : पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात वनऔषधींचा अनमोल खजाना दडला आहे. २७० विविध प्रजातीची दुर्मिळ वनौषधी या जंगलात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आंध्रप्रदेश व मराठवाड्यातील तस्करांची नजर या वनौषधीवर गेली आहे. सागवान कत्तलीसोबत दुर्मिळ वनौषधीनी नष्ट होण्याची भीती आहे.उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीच्या तीरावर पैनगंगा अभयारण्यात पसरले आहे. या अभयारण्यात वन्यजीवांसोबतच दुर्मिळ वनऔषधी आहे. त्यात गुळवेल, धामणवेल, पिंपळवेल, गवतपर्णी, खैर, मारदन, सूर्या, कदंब, मोह, चारोळी, आवळा, बेहळा, अंजन, चिंच, सालई, हळदबेरा, पांघरा, पळस, चंद्रज्योती, पिंपळ, बिजासाग, गिदासाग, चिमनसाग आदी वृक्ष असून निर्गुडा, बोराटी, भराटी, आमटी, रानमुनिया आदी झुडूपी वनौषधी आहे. तर गवत जातीतील तिरकडी, पवना, मारवेल, कुसळी, कुंदा या जाती आहे. यासह इतर २७० जातीची वनऔषधी या जंगलात आहे. जंगलातील रहिवासी आपल्या परंपरागत ज्ञानाचा उपयोग करून वनऔषधीचे जतन करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंध्र व मराठवाड्यातील तस्कर या जंगलात सक्रिय झाले आहे. सागवानासोबतच वनऔषधी झाडे तोडण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांना वनऔषधीची माहिती नसल्याने मुळा सकट झाड उपटून नेण्याचे प्रकार घडत आहे. तसेच विविध बहुमूल्य वृक्ष तोडण्यासाठी परप्रांतातील मंडळी येथे डेरे दाखल असतात. पांढरा पळस हा दुर्मिळ असून या जंगलात पांढरा पळस असल्याची माहिती आहे. या पळसाच्या शोधात अनेक जण नेहमी असतात. पांढऱ्या पळसाच्या शोधात इतर पळसवृक्षांवर ते सर्रास कुऱ्हाड चालवीत आहे. गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्याही या भागात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून जंगलामध्ये मोठमोठाले खड्डे खोदले जात आहे. या खड्ड्यांमुळे वृक्षांना धोका पोहोचत आहे. (वार्ताहर)