शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांचे पुन:सर्वेक्षण गरजेचे

By admin | Updated: September 16, 2015 03:09 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

नियंत्रण सुटले : अवैध व्यवसायाचे प्रस्थ प्रचंड वाढलेपुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व पोलीस विभागात समन्वयच नसल्यामुळे या समित्यांच्या स्थापनेचा मूळ हेतू यशस्वी होताना दिसत नाही. या समित्यांचे गावावरील नियंत्रण सुटल्याने गावात अवैध व्यवसायाचे प्रस्थ फोफावले आहे. त्यामुळे किमान पुरस्कार प्राप्त गावांचे पुनर्सर्वेक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावात उद्भवणाऱ्या लहानसहान तंट्यांचे दंगल व मोठ्या भांडणात रुपांतर होऊ नये, गावातील वाद गावातच सामंजस्याने सोडविले जावे, नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत व्हावी, गावात सामाजिक सलोखा कायम राहून शांतता टिकावी यासाठी राज्याच्या गृह विभागाने पुढाकार घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरू केली. या योजनेत तंटामुक्त गाव समिती व पोलिसांच्या सहकार्याने गावातील अवैध व्यवसायातील समुळ उच्चाटन करणे, गावात निवडणुका अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे गावातील शासकीय जागांवरील अतिक्रमण थांबविणे, तसेच गावात सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक एकता टिकून राहावी आदी कामांसाठी तंटामुक्त गाव समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करणाऱ्या तंटामुक्त समित्यांना लोकसंख्येच्या निकषांवर पुरस्कारही देण्यात आले. पुरस्काराची राशी ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा होताच तंटामुक्त समिती अध्यक्ष व निमंत्रकांचा ग्रामपंचायत कमिटीला विसर पडलेला दिसतो. त्यांना विश्वासात न घेताच सरपंच, सचिवांनी ठरवून दिलेले निकष धाब्यावर बसवून नियमबाह्य खर्च करणे सुरू केले आहे. या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांची गावातील पकड सैल झाली व गावात पुन्हा एकदा अवैध धंदे फोफाऊ लागल्याचे दिसून येते. गावागावात सट्टा व्यावसाय मोठ्या प्रमाणात आबाल-वृद्धांपासून पांढरपेशे व युवा वर्ग यामध्ये ओढल्या जात आहे. तंटामुक्त समित्या मात्र शांत दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)