शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

तानाजींची जिल्ह्याला पुन्हा हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:59 IST

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा हुलकावणी दिली.

ठळक मुद्देदर्शन दुर्लभ : शिवसैनिकांचा हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रा. तानाजी सावंत यांनी जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा हुलकावणी दिली.विधान परिषदेच्या निकालानंतर तानाजी सावंत विमानाने येथून थेट ‘मातोश्री’वर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते सुमारे वर्षभरापासून पुन्हा यवतमाळ जिल्ह्यात फिरकलेच नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा निमंत्रण पत्रिकेवर नामोल्लेख रहायचा. परंतु प्रत्येक वेळी आमदार सावंत यांची अनुपस्थिती राहिली आहे. सोमवारी पांढरकवडा येथे शिवसेनेने एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा कार्यक्रम शिवसेनेसाठी महत्वाचा होता. मात्र या कार्यक्रमालाही आमदार सावंत उपस्थित राहिले नाही. त्यामुळे गाजावाजा करून कार्यक्रमाचे आयोजन करणाºया शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा प्रचंड हिरमोड झाला. सततची अनुपस्थिती पाहता तानाजी शिवसेनेच्या येथील कारभारावर नाराज तर नाही ना, अशी शंका शिवसैनिकांमधूनच आता व्यक्त होऊ लागली आहे.पांढरकवड्यातील शिवसेनेच्या या कार्यक्रमात खासदार भावनाताई गवळी यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. मुळात निमंत्रण पत्रिका अथवा सेनेने दिलेल्या जाहिरातींमध्ये त्यांचा नामोल्लेख नव्हता. हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ नाही, असा बचाव तेथील शिवसैनिक घेत असले तरी त्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत याचा संबंधितांना विसर पडल्याचे दिसते.