शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

खासगी जागेत बांधले तालुका क्रीडा संकुल

By admin | Updated: June 28, 2015 23:58 IST

तालुक्यातील खेळाडुंसाठी हक्काचे क्रीडा संकुल असावे याकरिता शासनाने ग्रामपंचायतींकडून संकुलासाठी जागा मिळविली.

कळंब येथील प्रकार : आठ वर्षानंतर फुटले बिंग, १५ लाखांचा खर्च, जमीन मालकाचा शोध घेण्यासाठी दवंडीनीलेश भगत  यवतमाळतालुक्यातील खेळाडुंसाठी हक्काचे क्रीडा संकुल असावे याकरिता शासनाने ग्रामपंचायतींकडून संकुलासाठी जागा मिळविली. मोठ्या थाटामाटात तत्कालीन स्थानिक मंत्री, आमदाराने दोनदा भूमिपूजन केले. आणि तब्बल आठ वर्षानंतर क्रीडा संकुल हे खासगी जागेत उभारल्याचे उघडकीस आले आहे. कळंबच्या तालुका क्रीडा संकुलावर १५ लाख रुपये खर्च केले. मात्र हे सर्व काम खासगी जागेत असल्याने शासनापुढे पेच निर्माण झाला आहे. नवीन क्रीडा धोरणानुसार तालुक्याच्या ठिकाणी एकाच परिसरात विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षणाच्या दृष्टीने अद्ययावत सुविधांनी युक्त असे क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे. यासाठी राज्य शासन प्रत्येक तालुक्याला एक कोटींचा निधी देत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या योजनेसाठी ई-क्लास जागेची निवड करून जागा अधिग्रहीत करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात क्रीडा धोरणानुसार १६ तालुक्यांमध्ये क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. कळंब येथे २००५-०६ मध्ये क्रीडा संकुलासाठी जोडमोहा रोडवरील गट क्र. ६२६ मधील तीन हेक्टर ७७ आर जागा निवडण्यात आली. तत्कालिन जिल्हा क्रीडा अधिकारी जयप्रकाश डुबळे यांनी ग्रामपंचायतीकडून या जागेसंदर्भात करारनामाही करून घेतला. याच ठिकाणी खेळाडुंसाठी आता क्रीडा संकुल होणार आहे, या बातमीने तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. तत्कालिन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते क्रीडा संकुलाच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. २०१२-१३ मध्ये या संकुलाच्या बांधकामाचा प्रारंभ झाला. तेव्हा वसंत पुरके यांच्या हस्ते दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्यात आले. या जागेवर क्रीडा विभागाने सध्या लेव्हलिंग व रिटर्रनिंग वॉलचे काम केले आहे. यावर १५ लाख रुपये खर्चही करण्यात आला. आॅक्टोबर २०१४ मध्ये मात्र तालुका क्रीडा संकुलाची जागा ही ई-क्लासची नसून एका खासगी व्यक्तीच्या मालकीची असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली. यामुळे ग्रामपंचायत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे. चुकीने का होईना खासगी जागेत शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला. यातून मार्ग काढण्यासाठी कळंबच्या तहसीलदाराने जाहिरनामा काढला. ज्या व्यक्तीची ही जागा असेल त्याने १५ दिवसांच्या आत संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. हा जाहिरनामा ग्रामपंचायत फलकावर प्रसिद्ध करण्यात आला असून, ग्रामपंचायतीने याची दवंडीही दिली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुढील तजवीज म्हणून कळंब येथे क्रीडा संकुलासाठी पर्यायी जागेचा शोधही घेतला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये खंड भूमापन क्र. ४९५ मधील २ हेक्टर ८० आर जागा निश्चित केली आहे. जागेच्या मोजणीसाठी शासनाकडे ३५ हजार रुपयांचे शुल्कही भरले आहे. कळंबच्या क्रीडा संकुलाची जागा निश्चित करताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायतीने कोणतीच दक्षता घेतली नाही. ई-क्लासची जागा समजून थेट खासगी व्यक्तीच्या मालकीतील जागेवर शासनाच्या पैशाने बांधकामही केले. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना चांगलेच धारेवर धरले. याबाबत स्पष्टीकरणही मागितले आहे.