महागाव : येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदारांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे असलेली डाक तहसीलमागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळून आली. हा प्रकार जागृत नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर डाक महागाव पोलीस ठाण्यात जमा केली. महागाव तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूला गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास काही जण लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी त्या ठिकाणी काही पत्र पडलेले आढळून आले. त्यांनी सदर पत्र उचलून बघितले असता जिल्हा शल्यचिकित्सकांनी तालुका दंडाधिकाऱ्यांना पाठविलेले पत्र होते. तसेच दुसरे पाकीट कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या नावे होते. सदर पाकीट घेऊन संबंधित महागाव तहसीलमध्ये गेले. मात्र तहसीलदार उपस्थित नव्हते. त्यामुळे तेथील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना पत्र घेण्यास सांगितले. परंतु सर्वांनीच चक्क नकार दिला. त्यामुळे काळीदौलत ग्रामपंचायत सदस्य संतोष झिंगरे, संदीप ढगे, शंकर अढाव, उकंडा अढाव, गजानन अढाव यांनी महागाव पोलीस ठाण्यात सदर दोनही पत्र जमा केले. सदर डाक त्या ठिकाणी कशी गेली हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुका दंडाधिकाऱ्यांची डाक आढळली कचऱ्यात
By admin | Updated: February 13, 2015 01:50 IST