शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा प्लॉट घेताय... सावधान!

By admin | Updated: July 17, 2017 01:50 IST

दोघांनी मिळून मोठा प्लॉट घ्यायचा आणि दोघांची दोन स्वतंत्र घरे बांधायची, हा मध्यमवर्गीयांचा शिरस्ता आता मोडीत निघणार आहे.

संगणकीकृत सातबारा : यापुढे अर्ध्या प्लॉटच्या व्यवहारांवर बंदीअविनाश साबापुरे । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोघांनी मिळून मोठा प्लॉट घ्यायचा आणि दोघांची दोन स्वतंत्र घरे बांधायची, हा मध्यमवर्गीयांचा शिरस्ता आता मोडीत निघणार आहे. कारण अर्ध्या प्लॉटचा कोणताही व्यवहार यापुढे करता येणार नाही. संगणकीकृत सातबारा प्रणाली कार्यक्षमपणे राबविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. घर खरेदी करताना अनेक जण दोघे मिळून भागीदारीत मोठा प्लॉट खरेदी करतात. नंतर त्यावर हजार-दीड हजार चौरस फुटांचे दोन भाग करून दोन स्वतंत्र घरे बांधतात. यात चांगला शेजारी मिळण्यापासून, चांगल्या परिसरातील प्लॉट मिळण्यापर्यंतचे फायदे गृहित धरले जातात. अशा व्यवहारात दोघांच्याही जागांचे सातबारे ‘कॉमन’ असतात. अर्ध्या प्लॉटची मालकी स्वतंत्र असली तरी दोघांच्याही सातबाऱ्यावर दोन्ही भागीदारांची नावे येतात. मात्र, आता अशी भागीदारीतील जमीन खरेदी अशक्य होणार आहे. यासंदर्भात यवतमाळ तहसीलकडून सहायक दुय्यम निबंधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही अकृषक झालेल्या सर्वे नंबरमधील कोणत्याही प्लॉटचा अर्धा तुकडा पडेल, असे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या जागेची खरेदी होत असेल आणि त्यामुळे त्या जागेचा तुकडा पडणार असेल, तर असे व्यवहार न करण्याच्या सूचना तहसील कार्यालयातून सहायक दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या आहेत. सध्या तहसीलमध्ये प्रत्येक सातबारा संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीमध्ये अर्ध्या प्लॉटचा सातबारा जनरेट होत नाही. त्यामुळे अर्ध्या प्लॉटचा व्यवहार झाल्यास फेरफार करताना अडचणी जातात. त्यामुळे अशा प्लॉटच्या खरेदीची यापुढे नोंदणीच करण्यात येणार नाही. दोन हिस्से बंदआतापर्यंत जागेची खरेदी पूर्ण होण्यासाठी किमान १ हजार चौरस फुट जागेचा निकष होता. हा निकष नगरपालिका, महानगरपालिकांसाठी वेगवेगळा आहे. याचा आधार घेत आतापर्यंत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी, ले-आउटधारकांनी १५०० चौरस फुटांचे प्लॉट दोन ग्राहकांना एकत्रितपणे विकले आहेत. यात दोघांचाही सातबारा ‘कॉमन’ ठेवण्यात येतो. परंतु, आता अर्ध्या-अर्ध्या प्लॉटची खरेदीच नोंदणीकृत होणार नाही. संबंधित प्लॉट कितीही मोठा असला तरी त्याचा खरेदीदार एकच असणे आवश्यक ठरणार आहे.