शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षावरील युवांना मतदार यादीत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:34 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्यांमध्ये बदल, सूचना, नवमतदारांची नोंदणी आदी कामे सुरू आहे.

ठळक मुद्देपीयूष सिंह यांचे निर्देश : अधिकारी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्यांमध्ये बदल, सूचना, नवमतदारांची नोंदणी आदी कामे सुरू आहे. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे तसेच १८ वर्षांवरील सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावी, असे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी येथे सांगितले.मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आयुक्त बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले, स्वप्नील कापडनीस आदी उपस्थित होते.१ जानेवारी २०१९ या दिनांकाला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना मतदार करणे आवश्यक आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या. नवमतदार नोंदणीकरिता प्राचार्यांची बैठक बोलवावी, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीसुध्दा युवा मतदारांच्या नोंदणीसाठी पक्षाच्या युवा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे. आदिवासी भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांची नावे यादीत समाविष्ठ करून घ्या आदी सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या. बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मनिष गंजीवाले, संजय धात्रक, शिवसेनेचे पराग पिंगळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. सचिन येरमे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक