शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात पाणी आणा, रस्ते वाचवा अन् गुन्हेगारी थांबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:06 IST

एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.

ठळक मुद्देआता सहनशक्ती संपली : सर्वसामान्यांची जिल्हा कचेरीवर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एकीकडे टंचाईत पाणी आणण्याच्या नावाखाली यवतमाळातील प्रत्येक रस्ता फोडून टाकण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी हाल अन् दुसरीकडे रस्त्यावरून चालण्याचे बेहाल आहेत. त्यातच प्रशासनाची जरबच संपल्याने गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. हा सर्व प्रकार तातडीने थांबवा, अशी आर्त हाक देत सोमवारी सर्वसामान्य यवतमाळकर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, आम्ही पाणीही आणू शकलो नाही अन् रस्तेही वाचवू शकलो नाही, अशी हतबलता यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.यवतमाळ शहरातील तीव्र पाणीटंचाई, रस्त्यांच्या बेलगाम खोदकामांविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. शेवटी ‘आम्ही यवतमाळकर’ अशा नावाने सोमवारी नागरिकांनी एकत्र येत प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांची भेट घेतली. शासन कोणत्याही पक्षाचे असो, आम्हाला काही करायचे नाही. निदान प्रशासनाने तरी जनतेच्या हिताचे काम करावे, अशी विनवणी करण्यात आली.टँकरचे पाणी फिल्टर प्लान्टमध्ये टाकासमाजसेवेच्या नावाखाली टँकरद्वारे पाणी वाटप केले जात आहे. ते आरोग्याला अपायकारक आहे. शिवाय, पाणीवाटपावरून वाद उद्भवत आहेत. त्यामुळे सर्व टँकर आधी प्राधिकरणाच्या फिल्टर प्लान्टमध्ये एकत्र करावे. तेथून फिल्टर केलेलेच पाणी प्राधिकरणाच्या पाईपलाईनद्वारे घरोघरी पोहोचवावे, अशी प्रमुख मागणी यावेळी अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अमित मिश्रा आदींनी केली. तसेच टँकरच्या पाण्यावरून नगरसेवकांनाही टार्गेट केले जात असल्याची व्यथा यावेळी नगरसेवक सुजित राय, चंद्रशेखर चौधरी यांनी मांडली. पाणी न आल्यास कायदा व सुवव्यस्थाही बिघडण्याचा धोका असल्याचे जिल्हाधिकाºयांना सांगण्यात आले. पाणीसमस्या सोडविण्यासाठी शासन, प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांचे व्यासपीठ तयार करून चर्चा घडवावी, असा प्रस्ताव देवानंद पवार यांनी मांडला.दहा दिवसांचा अल्टिमेटमशहरात पाणीपुरवठा करण्याच्या विविध तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या निघून गेल्या तरी पाणी पोहोचले नाही. आता आणखी १० दिवस आम्ही यवतमाळकर देतो. प्रशासनाला भिक लागली असेल तर आम्ही पैसाही देऊ. पण १० दिवसांत शहरात पाणीपुरवठा करा, अन्यथा सर्वसामान्य जनताच कायदा हाती घेईल आणि तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.गुंडांना राजकीय संरक्षण कशाला?यवतमाळ शहरात गुन्हेगारी घटना दररोज घडत आहेत. प्रशासनाची पाहिजे तशी जरब उरलेली नाही. प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जात असताना अनेक गुंडांना पक्षपातीपणे संरक्षण देण्याचे कामसुद्धा केले जात आहे. अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये राजकीय हस्तेक्षेपही दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला. केवळ एकाच पक्षाच्या मतदारांनी या शहरात राहावे का, केवळ ‘त्यांच्या’च कार्यकर्त्यांना येथे जगण्याचा अधिकार आणि इतरांनी काय गाव सोडून जावे का, असा सवाल विचारण्यात आला.