शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ण वेतनासाठी शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:50 IST

वर्षानुवर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षकांनी

मुख्यमंत्र्यांना निवेदन : उच्च माध्यमिक शाळांनी पाळला बंद लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्षानुवर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. शंभर टक्के वेतन अनुदान देण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक कृती समितीच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून विनाअनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी तिरंगा चौक परिसरात धरणे आंदोलनाला सुरूवात केली. यापूर्वी वेतनाच्या मागणीसाठी २०० आंदोलने केली. तरीही न्याय मिळाला नाही. २००१ पासून अनेक शिक्षक विनावेतन कार्यरत आहेत. आता या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तीन वर्षांपूर्वी मूल्यांकन करूनही शासनाने मूल्यांकनपात्र शाळांची यादी घोषित केलेली नाही. या अन्यायाविरुद्ध सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन कृती समितीच्या माध्यमातून बंद पाळला. मूल्यांकन पात्र याद्या घोषित करून १०० टक्के अनुदानाची तरतूद करावी, पुणे येथील संचालक कार्यालय व आयुक्त कार्यालयातून त्वरित मूल्यांकन पात्र प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संचमान्यतेमध्ये पदे निर्माण करून त्वरित वैयक्तिक मान्यता द्यावी, उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालय विभाग, तुकड्यांविषयी अपात्र शाळांचे आॅफलाईन मूल्यांकन त्वरित करावे आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आले. यावेळी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम येरेकार, जिल्हा सचिव प्रा. संदीप विरुटकर, उपाध्यक्ष प्रा. आनंद चौधरी, जिल्हा संघटक प्रा. उमाशंकर सावळकर, प्रा. आकाश पायताडे आदी उपस्थित होते.