शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सण-उत्सवात निवृत्त पोलिसांची सेवा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:26 IST

सेवानिवृत्त कर्मचारी हे पोलीस विभागाचाच भाग असून भविष्यात निवडणूक, सण-उत्सवातील बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.

ठळक मुद्देएम. राज कुमार : निवडणुकीतही मदतीला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सेवानिवृत्त कर्मचारी हे पोलीस विभागाचाच भाग असून भविष्यात निवडणूक, सण-उत्सवातील बंदोबस्तासाठी त्यांची मदत घेतली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार सोहळा येथे सोमवारी घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून राज कुमार बोलत होते. सेवानिवृत्तांच्या कुठल्याही अडचणी तातडीने सोडविल्या जाईल, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक रमेश मेहता होते. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश सोने, सेवानिवृत्त उपअधीक्षक सदाशिवराव भालेराव, उपअधीक्षक चंदनसिंह बायस, दयाराम चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तीनी कार्यरत कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. संचालन कैलास राऊत यांनी केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब पंधरे, उपाध्यक्ष अरुण शुंकर, गणेश शेरे, कोषाध्यक्ष महेश कळसकर, सचिव पांडूरंग शेलारे, दयानंद बनसोडे, दीपक देशमुख, प्रल्हाद गवळी, गणपत गिनगुले, अकील देशमुख, गजानन गिरी, सुभाष वांढरे, विनायक सुरपाम, केशव निथळे, गोविंद चेटलेवार, कृष्णा बेदरकर, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.विना मानधन सेवा देणार -चंदनसिंह बायसगणेशोत्सव, दुर्गोत्सव, अन्य सण-उत्सव आणि निवडणूक काळात पोलीस विभागाला बंदोबस्तासाठी सेवानिवृत्त पोलीस विना मानधन सेवा देतील अशी ग्वाही संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक चंदनसिंह बायस यांनी यावेळी दिली.