शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची घ्या काळजी; ओपीडीमध्ये झालीय दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 05:00 IST

आरोग्य विभागाच्या यंत्रणेने छोट्या बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार ठेवला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण नसले तरी डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, ताप, रक्ताचे प्रमाण कमी असणे, बाळकफ असे विविध आजार असलेली छोटी मुले रुग्णालयांमध्ये वाढली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही छोट्या बालकांची रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे गावापासून ते शहरापर्यंत रुग्णालयांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वातावरणामध्ये बदल होताच रुग्णालयांमध्ये लहान मुलांची संख्या वाढली आहे. शासकीय रुग्णालयाची ओपीडी दुपटीने वाढली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने छोट्या बालकांसाठी स्वतंत्र वाॅर्ड तयार ठेवला आहे. मात्र कोरोनाचे रुग्ण नसले तरी डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, ताप, रक्ताचे प्रमाण कमी असणे, बाळकफ असे विविध आजार असलेली छोटी मुले रुग्णालयांमध्ये वाढली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयातही छोट्या बालकांची रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे गावापासून ते शहरापर्यंत रुग्णालयांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे. 

२० टक्के मुलांची कोरोना चाचणी- दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १५ ते २० बालके दाखल होत आहे. त्याच प्रमाणे खासगी रुग्णालयात मोठी संख्या आहे. - बालकांचा ताप उतरत नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून कोरोना चाचणी केली जात आहे. त्यातील २० टक्के पाॅझिटिव्ह येतात. 

डेंग्यू-मलेरियाची चाचणीडेंग्यू, मलेरिया आणि कोविडची लक्षणे सारखीच आहे. बहुतांश बालकांना पोस्ट कोविड असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यामध्ये ॲन्टिबाॅडीज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका तेवढा नाही. प्रथमत: डेंग्यूची चाचणी करून लक्षणे जाणून घेतली जात आहे. 

बालरोग तज्ज्ञ म्हणतात....

रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. यामध्ये डेंग्यू मलेरियाचे रुग्ण जास्त आहे. एमआयएससी हा आजार काहींमध्ये पहायला मिळाला आहे. छोटी मुले आजारी पडल्यानंतर तात्काळ उपचार केल्यास पुढील त्रास पालकांना टाळता येतो.  - डाॅ. स्वप्नील मानकर,       भारतीय बालरोग संघटना, सचिव

वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विविध आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे. या परिस्थितीत उपचारानंतर बालके बरी झाली आहेत. आता पालकांनी बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे.          - डाॅ. केशव केशवाणी,        भारतीय बालरोग संघटना, अध्यक्ष

ही घ्या दक्षता

मुलांना पावसात बाहेर नेऊ नका, त्यांची विशेष खबरदारी घ्या. 

घरातील कुलर रिकामे करा, आजूबाजूला डबके साचले असेल तर ते साफ करा.  

मुलांना मास्क लावा, सॅनिटायझर आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

 

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू