शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यामध्ये पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:31 IST

दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.

ठळक मुद्देबोगस कामे वाढली : १७ ग्रामपंचायतीत समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे करण्यात आली. या अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ बोगस पाईपलाईनमुळे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या निकृष्ट, तर मोटारपंपाचा दर्जा सुमार आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेततळ्यांसाठी तीन गावांची निवड करण्यात आली. शेततळ्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे संकेत आहे. दोन ग्रामपंचायतींनी जागा दिली मात्र इंद्रठाणा ग्रामपंचायतीने अजूनही यादृष्टीने पाऊले उचलली नाहीत. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. शेततळे पूर्ण होऊन त्यात पाणी केव्हा जमा होणार हा प्रश्न आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी, वटफळी, शहापूर आदी गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची अक्षरश: जागल सुरू आहे.ग्रामस्वच्छता अभियान रखडलेतेराव्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्याचे डांबरीकरण, पाण्याची मुबलक सोय अशा कामांना प्राधान्य दिले जाते. लाखो रुपयांचा निधी यासाठी उपलब्धही करून देण्यात आला. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान थांबले आहे. हागणदारीमुक्त गाव अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्याच्या कामात गैरप्रकार वाढले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येते.