शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

सामाजिक सलोख्याचे प्रतीक गणबादेव गणपती

By admin | Updated: September 1, 2014 23:54 IST

गणेशोत्सवाला महाराष्ट्रात लोकजागृती आणि लोक प्रबोधनातून प्रारंभ झाला. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवत पुसद येथील गणबादेव गणेश मंडळ गत १०९ वर्षांपासून प्रबोधनाची परंपरा जोपासत आहे. सामाजिक सलोख्याचे

१०९ वर्षांची परंपरा : मुस्लीम कारागिरांकडून रथाची निर्मिती, भोईबांधव ओढतात रथ, पुसदचे ग्रामदैवत प्रकाश लामणे - पुसदगणेशोत्सवाला महाराष्ट्रात लोकजागृती आणि लोक प्रबोधनातून प्रारंभ झाला. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवत पुसद येथील गणबादेव गणेश मंडळ गत १०९ वर्षांपासून प्रबोधनाची परंपरा जोपासत आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या गणबादेवाच्या रथाची निर्मिती मुस्लीम कारागिरांनी केली असून दरवर्षी भोईबांधव हा रथ ओढून आपली परंपरा जोपासत आहे. संपूर्ण राज्यात पुसद हे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभलेले शहर आहे. येथे विविध उपक्रम राबविण्याची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी तर पुसद नगरीला स्वराज्याची पंढरी असे संबोधले होते. त्याच लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या गणेशोत्सवाची अस्सल परंपरा पुसदचा गणबादेव गणेश मंडळ राखत आहे. पूस नदीच्या तीरावर हुडकेश्वर वार्डात १९०५ साली धारु पाटील यांनी १९०५ साली गणबादेवाची स्थापना केली. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील सखाराम पाटील, तिसऱ्या पिढीतील दत्तराव पाटील, चौथ्या पिढीतील शेषराव पाटील आदींनी समाज प्रबोधनाचा वसा कायम ठेवला. आजच्या धावपळीच्या युगातही गणबादेव गणेशोत्सवाने आपले पावित्र्य जोपासले आहे. जातीय व सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण केला आहे. २०११ पासून भक्तगणांनी गणबादेवाला ११ ग्रॅम सुवर्णदंत आणि १४ किलो वजनाच्या चांदीच्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान केले आहे. गणबादेवाच्या डोक्यावरील चांदीचे छत्र मूर्तीची शोभा वाढवीत आहे. गणबादेव गणेशोत्सव मंडळ दरवर्षी भजन, कीर्तन यासह व्यसनमुक्ती कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वृक्षारोपण, नेत्रदान गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे.स्थापना व विसर्जनाच्या दिवशी लक्षवेधी नक्षीकाम केलेल्या रथातून गणबादेवाची मिरवणूक काढण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील शेख सर्फराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणबादेवाचा रथ तयार केला आहे. तर पारंपरिक पद्धतीने गणबादेवाचा रथ येथील भोईबांधव ओढतात हेच गणबादेवाचे महत्वाचे वैशिष्ट्य होय.सध्या गणेशोत्सवाची धुरा शरद पाटील, मधुकर पंडितकर, विलास पंडितकर, सुधाकर वाशिमकर, ललित सेता, सुदेश सांबरे, सतीश पंडितकर, संजय शेंडे, अजय पाटील, सुरेश चौधरी यशस्वीपणे सांभाळत आहे.