शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सव्वादोनशे जागा, दीड हजार नामांकन

By admin | Updated: November 1, 2016 02:07 IST

नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना आॅनलाईनचा अडथळा पार करीत जिल्ह्यातील

यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करताना आॅनलाईनचा अडथळा पार करीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगरसेवकांच्या २१४ जागांसाठी तब्बल एक हजार ५५४ नामांकन दाखल झाले. तर आठ नगराध्यक्ष पदासाठी ११० जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. अखेरच्या दिवशी अर्जाचा पाऊस पडल्याने प्रशासकीय यंत्रणाही गोंधळून गेली होती. छाननी आणि उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची निवडणूक होत आहे. यासाठी यंदा प्रथमच आॅनलाईन नामांकन बोलविण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस एकही नामांकन दाखल झाले नाही. त्यानंतर आॅनलाईन प्रक्रियेत नेटवर्क जामचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यास आयोगाने मंजुरी दिली. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा मार्ग सुकर झाला. आॅफलाईन अर्ज स्वीकारण्यास ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आयोगाने वाढवून दिली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षासह आघाड्या आणि अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या २१४ नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल १ हजार ५५४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. सर्वाधिक अर्ज यवतमाळ नगरपरिषदेत दाखल झाले आहे. ५६ जागांसाठी ४५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आॅफलाईन पद्धतीने ५४ अर्ज भरण्यात आले आहे. दारव्हा नगरपरिषदेच्या २० जागांसाठी १५३ अर्ज दाखल झाले असून त्यातील १३९ आॅनलाईन आणि २४ अर्ज आॅफलाईन आहेत. घाटंजी नगरपरिषदेत १७ जागांसाठी १३५ नामांकन दाखल झाले असून १११ अर्ज आॅनलाईन तर २२ अर्ज आॅफलाईन आहे. दिग्रस नगरपरिषदेच्या २३ जागांसाठी १६२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात आॅनलाईन १३८ आणि आॅफलाईन १६ अर्ज आहे. पुसदमध्ये २९ जागांसाठी २०७ अर्ज दाखल झाले असून त्यात २५ अर्ज आॅफलाईन आहेत. उमरखेडमध्ये २४ जागांसाठी १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्यात २७ अर्ज आॅफलाईन आहेत. वणी नगरपरिषदेत २० जागांसाठी २३५ नामांकन दाखल झाले असून ११ नामांकन आॅफलाईन आहे. आर्णी नगरपरिषदेत १९ जागांसाठी १२७ जणांनी उमेदवारी दाखल केली असून त्यात सहा अर्ज आॅफलाईन पद्धतीने आहे. अर्जांची छाननी आणि उमेदवारी मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्तास अनेकांनी प्रचाराला प्रारंभ केला असून जिल्ह्यात दिवाळीचे वातावरण निवडणूकमय झाले आहे. तर उमेदवारी मागे घेण्यासाठी अनेकांची मनधरणी सुरु आहे. (शहर वार्ताहर) आठ नगराध्यक्ष पदांसाठी ११० उमेदवार ४यवतमाळ जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तब्बल ११० उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. यवतमाळ नगरपरिषदेत १७, दारव्हा १४, घाटंजी १२, दिग्रस २०, पुसद ७, उमरखेड १४, वणी २४ आणि आर्णीत ६ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शनही केले.