शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला

By admin | Updated: May 1, 2015 02:05 IST

झरीजामणी तालुक्यातील भीमनाळा येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत वांगू सूर्यभान टेकाम ...

मुकुटबन : झरीजामणी तालुक्यातील भीमनाळा येथे झाडाला लटकलेल्या अवस्थेत वांगू सूर्यभान टेकाम (४०) यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात घातपाताचा संशय बळावला असून पाटण पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.गेल्या २६ एप्रिलपासून वांगू टेकाम गायब होते. त्या दिवशी गावात एक लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू होती. याप्रसंगी गावात मृतक वांगू टेकाम, त्यांचा साळा महादेव मोतू आत्राम (४०) आणि चंद्रभान नानाजी मेश्राम (२२) हे तिघे नेहमीप्रमाणे सोबत वावरत होते. ते तिघेही एकत्रच होते. रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास ते गावालगतच असलेल्या भीमनाळा तलाव परिसरात फिरायला गेले. तेथे त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती प्राप्त झाली. दिवसभर मद्य प्राशन करून असल्याने ते तिघेही नशेतच होते. हा वाद विकोपाला गेल्याची शक्यता आहे.दरम्यान, दोन दिवस मृतक वांगू टेकाम घरी परतलाच नव्हता. त्यानंतर मंगळवारी २८ एप्रिल रोजी त्यांचा साळा महादेव आत्राम याने पाटण पोलीस ठाणे गाठून २६ एप्रिलपासून भाऊजी वांगू टेकाम बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच ते गावानजीक असलेल्या डोंगरावरील झाडाला फाशी घेऊन आढळल्याची माहिती दिली. यानंतर पाटण येथे नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मदने यांनी महादेवला सोबत घेऊन तडक घटनास्थळ गाठले. तेथे पंचनामा करून मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मडावी यांना माहिती दिली. दोन दिवसांपासून सडलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र हा आत्महत्या की घातपाताचा प्रकार, याबाबत गोंधळ होता. ठाणेदार मदने यांनी महादेवच्या हालचालीवरून त्यालाच बुधवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. आता शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या प्रकरणाचे गूढ कायमच राहणार आहे. मृतकाच्या पाठीमागे पत्नी व तीन मुली आहेत. त्यातील दोन मुलींचे लग्न व्हायचे आहे. (शहर प्रतिनिधी)