शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

रविवारचा बाजार चोरांना पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:46 IST

शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे.

ठळक मुद्देदिवसभरात उडविले दहा मोबाईल : मागील रविवारीही पाच चोरले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील रविवारचा बाजार चोरट्यासाठी पर्वणी ठरत आहे. मागच्या रविवारी आठवडी बाजार व दत्तचौक भाजी मार्केटमधून पाच जणांचे मोबाईल लंपास झाले होते. त्यानंतर थेट जिल्हा वाहतूक शाखेतून पोलीस जमादाराचा मोबाईल लंपास झाला. पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. रविवार ३० जूनला भरलेल्या बाजारातून एकाच वेळी दहा मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. अवधुतवाडी पोलीस ठाण्यात चार तक्रारी आल्या. तर शहर ठाण्यामध्ये सहा तक्रारी आल्या आहेत.पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे आपला हात साफ करत आहे. पोलीस केवळ गुन्हे दाखल करण्यापलिकडे कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळेच आता गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरायचा की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहर ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलवाडी भाजी मार्केटमधून एकाच वेळी सहा जणांचे ६६ हजार ९९९ रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. शर्टच्या अथवा पॅन्टच्या खिशातून मोबाईल काढले जात आहे. भाजी मार्केटमध्ये गर्दी होत असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी ६ स्वतंत्र तक्रारी नोंदविण्याऐवजी एकच सामूहिक तक्रार नोंदवून तीव्रता कमी दाखविण्याचा प्रयत्न केला. देवीदास विठ्ठल बढीये (४५) रा. शिरे ले-आऊट यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द सहा मोबाईल चोरल्याचा गुन्हा नोंदविला. अवधुतवाडी पोलीस ठाण्यात वृत्तलिहीपर्यंत गुन्हाच नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. तक्रार घेऊन आलेल्यांवरच प्रश्नाची सरबत्ती करून भंडावून सोडले जाते. आरोपीचा शोध घेण्याऐवजी फिर्यादीचीच उलट चौकशीचा प्रकार सुरू आहे.एलसीबी, विशेष पथक कुचकामीअवधुतवाडी ठाण्यातील पथक केवळ फिक्स पॉर्इंट राखण्यापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे एकही डिटेक्शन येथे झाले नाही. या ठाण्याचा कारभार सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांकडूनही कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर डिटेक्शन मास्टर अशी शेखी मिरवणारे विविध पथकही कुचकामी ठरत आहे. एलसीबीत फेरबदल झाले असून यवतमाळ शहराची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. या अधिकाºयापुढे मोबाईल चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.