शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘सुकन्या’चा बोजवारा

By admin | Updated: August 7, 2014 00:04 IST

मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘सुकन्या’ योजनेचा तालुक्यात प्रसार आणि प्रचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ७२ गावांतून केवळ ४५ अर्ज दाखल झाल्याने

नेर : मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘सुकन्या’ योजनेचा तालुक्यात प्रसार आणि प्रचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ७२ गावांतून केवळ ४५ अर्ज दाखल झाल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बाल विकास विभागाच्या गलथान कारभाराचा हा कळस आहे. मुलींचे शिक्षण व त्यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी आर्थिक तरतूद, भ्रूण हत्या रोखणे, बाल विवाहाला प्रतिबंध, मुलींचा जन्मदर वाढविणे आदी उद्देशाने महाराष्ट्रात १ जानेवारी २०१४ पासून ‘सुकन्या’ योजना लागू करण्यात आली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी ही योजना आहे. मात्र केवळ दोन अपत्य असलेल्या दाम्पत्यासाठी ही योजना आहे. यात प्रत्येक मुलीच्या नावे २१ हजार २०० रुपये एक वर्षाच्या आत गुंतविले जाते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला एक लाख रुपये प्रदान करणे अशी ही योजना आहे. या योजनेवरून सात महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही तालुक्यात आतापर्यंत केवळ ४५ अर्ज दाखल झाले आहेत. यात नेर १०, चिखली कान्होबा, मुकिंदपूर, पिंपळगाव(डुब्बा), शहापूर, वटफळी, कोलुरा, चिचगाव, माणिकवाडा, शेंद्री(खु), चिकणी(डो), सावरगाव, लोहतवाडी, कामनदेव, सातेफळ येथून प्रत्येकी एक तर मालखेड येथून तीन, चिखली, पांढरी, घुई येथून प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, मुलीच्या नावे जमा झालेल्या रकमेतून नाममात्र १०० रुपये प्रती वर्ष हप्ता घेवून त्याचाही विमा उतरविण्यात येतो. यात पालकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये, अपघाताने मृत्यू आल्यास ७५ हजार, दोन डोळे अथवा अन्य दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघाताने निकामी झाल्यास ३७ हजार ५०० याप्रमाणे लाभ दिला जातो. शिवाय या योजनेचा लाभ घेणाऱ्याच्या मुलीस शिक्षा सहयोग योजनेंतर्गत नववी ते बारावीपर्यंत सहा महिने दरमहा ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनांसाठीही नागरिकांचा प्रतिसाद नाही. या बाबीला बाल विकास विभागच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. योजनेचा प्रसार आणि प्रचारासाठी कुठलेही प्रयत्न या विभागाने केलेले नाही. या प्रकारातच योजनेच्या उद्दिष्टालाही ब्रेक लागला आहे. संबंधित विभागाने मात्र ही बाब अजूनही गांभीर्याने घेतलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)